ETV Bharat / state

Leopard Attack On Youth: दोन बिबट्यांचा मुक्त संचार, शेतात काम करणाऱ्या तरुणावर बिबट्याचा हल्ला

शेतात काम करणाऱ्या तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशातच भगूरजवळील लोहशिंगवे गावच्या गराडी नाल्याच्या रस्त्यावर शनिवारी सायंकाळच्या सुमारास दोन बिबटे मुक्त संचार करत असल्याचे काही वाहन चालकांनी पाहिले आहे.

Leopard attack on youth
तरुणावर बिबट्याचा हल्ला
author img

By

Published : Jul 30, 2023, 1:52 PM IST

तरुणावर बिबट्याचा हल्ला

नाशिक : मानववस्तीत बिबट्याचा वावर अलीकडे वाढला असल्याचे पाहावयास मिळत आहे. सध्या दारणानदी काठच्या पट्ट्यात नानेगाव, शेवगेदारणा, संसरी, भगूर, दोनवाडे, लहवित, वंजारवाडी ही गावे वसलेली आहे. या परिसरात बाराही महिने शेती हिरवीगार आहे. त्यामुळे बिबट्याला लपण्यासाठी मोठी जागा मिळत आहे. त्यामुळे रात्री व दिवसाही शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन होत आहे. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी : शनिवारी २९ जुलै रोजी सायंकाळी सात वाजेदरम्यान वंजारवाडी रस्त्यावर लोहशिंगवे गावालगत गराडी नाल्याजवळ दोन बिबटे दिसून आले आहेत. त्यामुळे वाहन चालकांसह शेतकरी भयभीत झाले आहेत. सध्या भात लावणी चालू आहे. ग्रामीण भागात लोडशेडींग असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री मोटार चालू बंद करावी लागत आहे. या बिबट्यांचा बंदोबस्त केला जावा, अशी मागणी होत आहे. या परिसरात वनविभागाकडून त्वरित पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी शेतकरी, वाहनधारक व ग्रामस्थांनी केली आहे.

तरूणावर बिबट्याचा हल्ला : नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मेंढी गावाजवळ एका १७ वर्षीय तरुणावर शुक्रवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या पाठीवर डोक्यावर बिबट्याने पंजा मारला आहे. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. कृष्णा सोमनाथ गीते, असे बिबट्याच्या हल्लात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

कृष्णा आणि बिबट्याची झटापट : कृष्णा हा सकाळी ६ वाजेच्या सुमारास आपल्या शेतात कामासाठी जात होता. यावेळी रस्त्यातच कृष्णावर या बिबट्याने पाठीमागून झडप मारली. बिबट्याचे दात कृष्णाला डोक्याला, छातीवर व पाठीला लागले. त्यात कृष्णाची आणि बिबट्याची काही वेळ झटापट झाली. यात बिबट्याला त्याने जोरदार धक्का दिला. बिबट्या बाजूला पडला आणि त्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक त्याच्या मदतीसाठी धावले. यामुळे थोडक्यातच कृष्णाचा जीव वाचला आहे. आजूबाजूचे लोक येताना दिसताच बिबट्याने शेतात धूम ठोकली, असे कृष्णाने ईटीव्ही भारतसोबत बोलताना सांगितले आहे.

हेही वाचा :

  1. Leopard Attack in Nashik: पायी चालणाऱ्या व्यक्तीवर पाठीमागून बिबट्याचा अचानक हल्ला, पहा थरारक व्हिडिओ
  2. Leopard Attack On Farmer: छत्रीमुळे बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले शेतकऱ्याचे प्राण; बिबट्या थेट पडला विहिरीत
  3. Leopard Attack News: राखणदारी करणाऱ्या कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला, मालकाने धाव घेतली अन्... पहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.