ETV Bharat / state

बिबट्याचा कामगारावर हल्ला; हेल्मेटमुळे वाचले प्राण - Kapil Bhaskar

इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीतील कामगार राहुल नाठे हा रात्री कामावरून घरी परतत असताना अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढविला. यावेळी नाठे यांनी बिबट्याशी काही काळ संघर्ष करत आपली सुटका केली. हेल्मेट असल्याने आपला जीव वाचला, असे नाठे यांनी म्हटले आहे.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Aug 2, 2019, 6:38 AM IST

नाशिक - इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीतील कामगार राहुल नाठे हा रात्री कामावरून घरी परतत असताना अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढविला. यावेळी नाठे यांनी बिबट्याशी काही काळ संघर्ष करत आपली सुटका केली. हेल्मेट असल्याने आपला जीव वाचला, असे नाठे यांनी म्हटले आहे.

गोंदे औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत राहुल नाठे हे काम करतात. रोजप्रमाणे ते आपले काम संपवून रात्री बारा वाजेच्या सुमारास घरी परतत होते. त्यावेळी जवळ एका शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. या हल्ल्यात नाठे दुचाकीवरून खाली पडले, बिबट्याने दोन्ही हाताच्या पंजाने त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यावेळी नाठे यांनी हिंमतीने बिबट्याशी दोन हात करत राहिले. पण, डोक्यात हेल्मेट असल्याने बिबट्याच्या हल्ल्यात त्यांचा जीव वाचला. या घटनेची माहिती त्यांनी भ्रमणध्वनीवरून तत्काळ वन विभागाला दिली. वनविभागाचे वनपाल देशपांडे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. अपघातात डोक्याला इजा होऊ नये म्हणून नाशकात हेल्मेट सक्ती केली आहे. पण, हेल्मेटमुळे बिबट्याच्या तावडीतूनही नाठे यांना आपला जीव वाचवता आला आहे.

ह्यापूर्वी देखील जवळच असलेल्या जाधव वस्ती येथे तानाजी नाठे यांच्या शेतातील वासरे आणि कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला चढवत त्यांचा फडशा पाडला होता. तसेच काही दिवसांपूर्वीच येथे एका बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या यश आले होते. या हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी औद्योगिक वसाहतीतील कामगारांनी केली आहे.

Intro:बिबट्याचा कामगारावर हल्ला, हेल्मेटमुळे वाचले प्राण...

Body:नाशिक बिबट्या इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीतील कामगार राहुल नाठे रात्री बारा वाजता कामावरून घरी परतत असतांना अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला,यावेळी नाठे यांनी बिबट्याची काही काळ संघर्ष करत आपली सुटका केली,हेल्मेट असल्याने आपला जीव वाचला असं नाठे यांनी म्हटलं आहे...

गोंदे दुमाला औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत काम करणारे राहुल नाठे हे रात्री बारा वाजेच्या सुमारास कामावरून घरी परतत असतांना,जवळ एका शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला,या हल्ल्यात नाठे दुचाकीवरून खाली पडले,बिबट्याने दोन्ही हाताच्या पंजाने त्यांच्यावर हल्ला चढवला,नाठे यांनी हिंमतनं हाराता त्याच्या शी दोन हात करत राहिले...पण नशीब बलवत्तर डोक्यात हेल्मेट असल्याने बिबट्याच्या हल्ल्यात त्यांचा जीव वाचला..या घटनेची माहिती त्यांनी दूरध्वनीवरून वन विभागाला दिली, वनविभागाचे वनपाल देशपांडे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली...

ह्यापूर्वी देखील जवळच असलेल्या जाधव वस्ती येथे तानाजी नाठे यांच्या शेतीत वासरे ,कुत्री ह्या प्राण्यांवर हल्ला चढवत बिबट्यांनी त्यांचा फडशा पाडला होता,तसेच काही दिवसांपूर्वीच येथे एका बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या यश आलं होतं...या हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी औद्योगिक वसाहतीतील कामगारांनी केली आहे...

टीप
ह्या बातमीला बिबट्याचा फोटॊ वापरणे...

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.