ETV Bharat / state

Leopard Attack On Farmer : मालेगावच्या सोनजमध्ये बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला - नाशिक बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला

मालेगाव तालुक्यातील सोनजसह ( Malegaon Leopard Attack ) आदी गावांत बिबट्या आल्याची अफवा उडाली होती. मात्र, एका शेतकऱ्यांवर रात्री 10च्या सुमारास बिबट्याने हल्ला करून ( Leopard Attack On Farmer ) जखमी केले आहे.

Malegaon Leopard Attack
Malegaon Leopard Attack
author img

By

Published : Mar 6, 2022, 7:02 PM IST

नाशिक - मालेगाव तालुक्यातील सोनजसह ( Malegaon Leopard Attack ) आदी गावांत बिबट्या आल्याची अफवा उडाली होती. मात्र, एका शेतकऱ्यांवर रात्री 10च्या सुमारास बिबट्याने हल्ला करून ( Leopard Attack On Farmer ) जखमी केले आहे. ही घटना 3 मार्चच्या रात्री घडली. यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आता याची गंभीर दखल घेत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावले आहेत.

गावकरी भितीच्या सावटाखाली -

गेल्या काही दिवसापासून अफवा समजला जाणाऱ्या बिबट्याने 3 तारखेला सोनज येथे शेतकऱ्यावर हल्ला केला. सोनज येथील शेतकरी बारकु बच्छाव हे रात्री १० च्या सुमारास सोनज वऱ्हानेपाडा रस्त्यावरील शेतात पाणी देण्यासाठी गेले असता त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. सुदैवाने झटपटीमुळे बच्छाव यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. शेतात पाणी देण्यासाठी गेले असता अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने बच्छाव यांच्या अंगावर झडप घालून हल्ला केला. परंतु जोराने आवाज करत झटापट केल्यामुळे बिबट्याने पळ काढला. बिबट्या सोबत लहान पिल्लूदेखील दिसले. मात्र, ते कोणत्या दिशेस गेले हे निश्चित होऊ शकले नाही. रात्रीच्या वेळी वीज उपलब्ध होत असल्यामुळे अंधारात जीव मुठीत धरून शेतकऱ्यांना पाणी भरण्यासाठी जावे लागत आहे. तरी या घटनेमुळे सोनज पंचक्रोशीत प्रचंड दहशत पसरली असून नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत.

हेही वाचा - Shane Warne Death : शेन वॉर्नबाबात थायलंड पोलिसांचा महत्वाचा खुलासा; म्हणाले, "...अन् टॉवेलवर रक्ताचे"

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.