नाशिक - आरोग्य विभागाच्यावतीने होणाऱ्या परिक्षेदरम्यान, कोरोनाच्या नियमावलीचे पालन केल्या गेल्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थिंनी गोंधळ घातला. हा प्रकार सी. एम .सी. एस. महाविद्यालयात घडला. दरम्यान, यामुळे परीक्षा सुरू होण्यास सुमारे एक तास उशीर झाला.
एका बेंचवर दोन विद्यार्थी -
आरोग्य विभागाच्यावतीने आज वेगवेगळ्या पदांसाठी दिलेल्या जाहिरातीनुसार लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. ही परीक्षा शहरातील काही महाविद्यालयांमध्ये आणि शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती. मात्र, गंगापूर रोडवरील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सी. एम सी .एस. महाविद्यालयामध्ये आरोग्य विभागाकडून कोणत्याही प्रकारच्या सुरक्षितेचे पालन करण्यात येत नव्हते. एका बेंचवर दोन विद्यार्थी तसेच या ठिकाणी सॅनिटायझेशन करण्यात आले नव्हते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे निर्माण परिस्थितीवर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ज्या सर्व नियमांचे पालन होणे अपेक्षित होते. त्यापैकी कोणतेही पालन केले जात नसल्याने परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - ठाण्यातच पोलिसाला मारहाण; सिरसाळा येथील प्रकार
नाशिकच्या गंगापूर रोड भागात असलेल्या सी.एम.सी.एस कॉलेज मधील प्रकार -
याबाबत चौकशी केली असता ही सर्व जबाबदारी आरोग्य विभागाची असल्याचे सी. एम. सी. एस. महाविद्यालय प्रशासनाने सांगितले. महाविद्यालय प्रशासनाने जबाबदारी झटकण्याचे काम केले. यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. शेवटी नियोजित वेळेवर ती म्हणजे सकाळी दहा वाजता हा पेपर सुरू होऊ शकला नाही. त्यामुळे एक तासांनतर ही परीक्षा सुरू झाली आहे.