ETV Bharat / state

धक्कादायक...परराज्यातून परतलेल्या मजुरांचे गावाबाहेर झाडाखाली विलगीकरण

बाहेरून स्थलांतरित होणाऱ्या रहिवाशांना शासकीय नियमानुसार घोषित केलेल्या विलगीकरण केंद्रात भरती करून त्याच्या अन्नपाण्याची सोय करणे प्रशासनाचे कर्तव्य असताना शेकडो स्थलांतरित मजुरांची मात्र हेळसांड होताना दिसत आहे.

author img

By

Published : May 7, 2020, 1:36 PM IST

labour quarantine under the tree in antapur baglan
धक्कादायक...परराज्यातून परतलेल्या मजुरांचे गावाबाहेर झाडाखाली विलगीकरण

सटाणा (नाशिक)- परराज्यातून गावी आलेल्या मजुरांचे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गावपातळीवर गावाबाहेर विलगीकरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंतापूर येथील या मजुरांना गावाबाहेरील झाडाखाली, डोंगर कपारीत किंवा नदीकाठी राहण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.

कोरोनासारख्या महाभयंकर रोगाच्या संक्रमणामुळे संपूर्ण जग हादरले आहे. लॉकडाऊनच्या काळात समाजातील प्रत्येक घटक अन्न-पाण्यावाचून वंचित राहू नये म्हणून मोफत धान्य देण्यात आले. मात्र ते रेशनकार्ड अभावी खऱ्या वंचितांच्या पोटात न गेल्यामुळे हे कष्टकरी अन्न धान्यापासून वंचित असल्याचे भयावह वास्तव बागलाणमध्ये आहे.

लॉकडाऊनच्या काळात गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थानसह राज्याच्या अन्य ठिकाणी शेकडो मजूर अडकले होते. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांची घरवापसी सुरू झाली आहे. मात्र, गाव पातळीवर त्यांना गावाबाहेर विलगीकरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांना चौदा दिवस कामावर जाण्यास मज्जाव केला जात असल्यामुळे आज तरी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासन मोफत धान्य वाटत आहे. परंतु या कष्टकरी मजुरांकडे रेशन कार्डच नसल्यामुळे ते या योजनेपासून वंचित राहत आहेत.

वास्तविक बाहेरून स्थलांतरित होणाऱ्या रहिवाशांना शासकीय नियमानुसार घोषित केलेल्या विलगीकरण केंद्रात भरती करून त्याच्या अन्नपाण्याची सोय करणे प्रशासनाचे कर्तव्य असताना शेकडो स्थलांतरित मजुरांची मात्र हेळसांड होताना दिसत आहे. कुणी डोंगर कपारीचा तर कोणी नदीकाठी, झाडाच्या आडोशाला सहारा घेऊन उघड्यावर राहून कोरोनाचे संक्रमण रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, अशा परिस्थितीत प्रशासन बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे.

बागलाण तालुक्यात सहा ठिकाणी कोरोना संशयितांसाठी विलगीकरण केंद्र उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये अजमीर सौंदाणे येथील शासकीय एकलव्य रेसिडेन्सीयल स्कूल, नामपूर, सटाण्यात चार ठिकाणचा समावेश आहे. मात्र, बहुतांश ठिकाणी पाण्याची आणि स्वच्छतागृहांची मोठी समस्या दिसून येत आहे.

आम्ही ऊसतोडणी मजूर आहोत. आम्ही नुकतेच स्थलांतरित झाल्यामुळे आम्हाला चौदा दिवस वस्तीच्या बाहेर ठेवले आहे. रेशनकार्ड नसल्यामुळे रेशम मिळाले नसल्याचे आणि झाडाखालीच विलगीकरण केल्यामुळे हाताला काम नसल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे अंतापूर येथील मजूर नानाजी भवरे यांचे म्हणणे आहे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.