नाशिक : नाशिकच्या ज्ञानदीप आधार आश्रमात (Gyandeep Aadhaar Ashram) अल्पवयीन मुलांकडून श्रमाचे काम (Child labor by minors) करून घेतल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. आडगाव पोलिसांनी आश्रमाचा संचालक हर्षल मोरेच्या विरोधात बालन्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या आधी संशयित हर्षल मोरेच्या विरोधात बलात्काराचे सात गुन्हे (case against ashram director Harshal More) दाखल करण्यात आले आहे. (Latest news from Nashik) सध्या मोरेची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. (Nashik Crime)
मुलांना वेठबिगाऱ्यासारखी वागणूक : पोलिसांनी दिलेल्या माहिती आणि पीडित मुलांनी दिलेल्या तक्रार नुसार, जानेवारी 2020 ते एप्रिल 2022 या कालावधीत द किंग फाउंडेशन ज्ञानदीप गुरुकुल आश्रम नाशिक येथे शिक्षणासाठी वास्तव्यास असताना संशयित हर्षल मोरे याचे वृंदावन नगर येथे रो-हाऊस आहे. आश्रमातून मुलांना या ठिकाणी जाण्यास सांगत त्यांच्याकडून धान्य निवडण्याचे काम तसेच कागदी द्रोण बनवण्याच्या कामाला लावले जायचे. हर्षल मोरे मुलांना विनामोबदला वेठबिगाऱ्यासारखी वागणूक देत होता. हे द्रोण तो मार्केटमध्ये होलसेल विक्री करण्यास पाठवत होता.
सात मुलींवर अत्याचार : संशयित मोरेच्या आश्रमात 13 मुली व 14 मुलांकडून कामे करून घेत त्यांची पिळवणूक करत होता. संशयित 13 मुलींपैकी 7 मुलींना आश्रमात असताना हात, पाय दाबण्यास सांगायचा. त्यांना मोबाईलमध्ये अश्लील फिल्म दाखवत त्यांच्यावर अत्याचार करत असल्याचे समोर आले आहे. याबाबत कोणास सांगितले तर आश्रमातून काढून टाकण्याची धमकी देत वारंवार अत्याचार करत होता.
असे फुटले बिंग : या आश्रमात राहणाऱ्या 14 वर्षीय मुलीवर संशयित मोरेने अत्याचार केल्यानंतर तिला त्रास झाला. तरी देखील संशयिताने दुसऱ्या दिवशी तिच्यावर बलात्कार केल्याने मुलींनी तिच्या बहिणीला घडलेला प्रकार सांगितला. यानंतर या प्रकाराला वाचा फुटली. यानंतर म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिस चौकशीत आश्रमातील सात पीडित मुलींनी त्यांच्यावर अत्याचार झाल्याचे जबाबात सांगितले. यानंतर आश्रमाचा संचालक मोरेच्या विरोधात बलात्कार व ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मोरेच्या सटाणा येथे मूळगावी दोन मुलींवर अत्याचार केल्याचे समोर आल्यानंतर सटाणा पोलिसात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या संशयित मोरेची रवानगी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.