ETV Bharat / state

Holi 2023: पंचांगानुसार 'हा' आहे होळी दहनाचा शुभ मुहूर्त; जाणून घ्या होळी कशी साजरी करावी...

6 मार्च रोजी होळीचा सण साजरा होणार आहे. पंचांगानुसार होलिका दहन मुहूर्त संध्याकाळी 6 वाजून 24 मिनिटांपासून ते 8 वाजून 51 मिनिटापर्यंत आहे. असा एकूण वेळ 2 तास 27 मिनिट असल्याचे महंत अनिकेत देशपांडे यांनी सांगितले.

Holi 2023
होळी दहन शुभ मुहूर्त
author img

By

Published : Mar 5, 2023, 9:38 AM IST

Updated : Mar 6, 2023, 7:48 AM IST

नाशिक : होळीचा सण सुरु झाला आहे. फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच हुताशनी पौर्णिमा होय. या दिवशी देशात सर्वत्र होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पौर्णिमेला होलीका दहन केले जाते. दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरे केले जाते. सर्वांच्या मनातून दृष्ट प्रवृत्तींचा नाश व्हावा आणि प्रत्येकाच्या जीवनात चागंल्या गोष्टी घडाव्यात, या उद्देशाने ठिकठिकाणी सार्वजनिक जागेत तसेच घराबाहेर होळीचे दहनाचा सण साजरा केला जातो.

काय आहे आख्यायिका : विष्णुपुराणानुसार, फक्त प्रल्हादाला हिरण्यकश्यपू वेगवेगळ्या प्रकाराने मारण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यात तो यशस्वी होत नाही. त्यामुळे होलिका नावाच्या आपल्या बहिणीला सांगतो की प्रल्हादाला मारायचे आहे, त्यानंतर होलिका ही आपल्या मांडीवर प्रल्हादाला घेऊन धगधगत्या चितेत प्रवेश करते. मात्र भगवान विष्णूच्या कृपेने भक्त प्रल्हाद वाचतात. होलिकेचे दहन होते. दृष्ट प्रवृत्तीचे दहन होते, त्यामुळे या सणाला विशेष महत्त्व आहे.

होळी सण कसा साजरा करावा : होळीमध्ये नानाविध वनस्पती, झाडांचा पालापाचोळा, गाईंच्या शेण्याच्या गौऱ्या, गाईचे शुद्ध तूप आदी एकत्र करून वेध मंत्रोच्चारात विष्णू भगवंतांच्या नामोचारात अतिशय आनंदाने प्रसन्नतेने, दृष्ट प्रवृत्तीचा नायनाट करण्यासाठी होलिकेचे दहन करायचे. त्यामध्ये प्रत्येकाने आपल्या राशी नक्षत्रानुसार जी वनस्पती आहे, ती त्यामध्ये समिधा म्हणून प्रविष्ट करायची आहे. याप्रकारे होळीचा सण साजरा करावा, असे महंत अनिकेत देशपांडे यांनी सांगितले. 'ॐ नमो भगवते वासुदेवाय त्रिविक्रमाय मृतार्क मध्ये संस्थिताय मम शरीरं अमृतं तेजं कुरु कुरु स्वाहा' हा मंत्र म्हणून होळीत आहुती द्यायची आहे.

होळीच्या दुसऱ्या दिवशी विरांची मिरवणूक : होळीच्या दुसऱ्या दिवशी दुपारनंतर शहरात पारंपरिक पद्धतीने वीरांची मिरवणूक काढली जाते. कुटुंबातील पूर्वजांचे टाक-खोबऱ्याचा वाटीत टाकून ते वाजत गाजत मिरवले जाते. त्यानंतर गोदावरी नदीत त्यांना स्नान घालून पूर्वजांप्रती श्रद्धा अर्पण केली. वीरांच्या मिरवणुकीचे वैशिष्ट्य 'दाजीबा वीर' आहे. दाजीबा वीर हे नवसाला पावतात, अशी अख्यायिका आहे. जुन्या नाशिक आणि रविवार कारंजा अशा दोन ठिकाणाहून दाजीबा वीरांची मिरवणूक नाशिक शहरातून हलगीच्या तालावर वाजत गाजत काढली जाते. विशेषतः अविवाहित मुली-मुले या वीराला बाशिंग वाहून दर्शन घेतात. या वीराला बाशिंग बांधल्यास अविवाहित मुला-मुलींचे लग्न जमतात,असे येथील लोक मानतात. त्यामुळे या वीराला बाशिंगी वीर असे ही म्हटले जाते. ठिकठिकाणी महिला या वीरांचे औक्षण करून दर्शन घेतात.

हेही वाचा : Shane Warne Death Anniversary : शेन वॉर्नच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त सचिनने केली भावनिक पोस्ट, म्हणाला..

प्रतिक्रिया देताना महंत अनिकेत देशपांडे

Last Updated : Mar 6, 2023, 7:48 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.