ETV Bharat / state

नाशिक लोकसभा मतदारसंघात जातीय समीकरण - किरण अग्रवाल - नाशिक

नाशिकमध्ये एक लोकसभा मतदार संघ आहे. यामध्ये ३ जगा भाजप, २ जागा शिवसेनेकडे आणि १ जागा काँग्रेस पक्षाकडे आहे. यामध्ये नाशिक मध्य भागातील १७ टक्के मुस्लीम, नाशिक पूर्वमधील ३५ टक्के मराठा, नाशिक पश्चिममधील २८ टक्के ओबीसी, सिन्नर येथील ३९ टक्के वांजरी आणि इगतपुरीमधील ५४ टक्के आदिवासी मतांचा एक गठ्ठा मतदान निर्णयक ठरणार, असा अंदाज आहे.

नाशिक
author img

By

Published : Mar 26, 2019, 5:35 PM IST

नाशिक - नाशिकमध्ये उमेदवाराची पात्रता, प्रचाराचे मुद्दे, विकासाचे धोरण, या सोबतच जात आणि धर्म हा निकष महत्वाचा मानला जातो हे आजवर झालेल्या निवडणुकीतून समोर आले आहे. यंदाही लोकसभा निवडणुकीत मराठा आणि ओबीसी समाजाची मते निर्णयाक ठरणार असल्याचे ज्येष्ठ पत्रकार किरण अग्रवाल यांनी म्हटले आहे.

ज्येष्ठ पत्रकार किरण अग्रवाल

नाशिकमध्ये ६ विधानसभा मतदार संघ तसेच एक लोकसभा मतदार संघ आहे. यामध्ये ३ जगा भाजप, २ जागा शिवसेनेकडे आणि १ जागा काँग्रेस पक्षाकडे आहे. यामध्ये नाशिक मध्य भागातील १७ टक्के मुस्लीम, नाशिक पूर्वमधील ३५ टक्के मराठा, नाशिक पश्चिममधील २८ टक्के ओबीसी, सिन्नर येथील ३९ टक्के वांजरी आणि इगतपुरीमधील ५४ टक्के आदिवासी मतांचा एक गठ्ठा मतदान निर्णयक ठरणार, असा अंदाज आहे.

नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून समीर भुजबळ उमेदवारी करीत आहेत. तसेच भाजपचे माजी आमदार माणिकराव कोकाटेदेखील बंडखोरी करत अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. वंचित आघाडीकडून पवन पवार यांना उमेदवारी जाहीर झाली असून नाशिकमधून मराठा मोर्चाचे नेतृत्व करणारे करण गायकर यांनीदेखील निवडणूक लढवण्यासाठी तयारी केली आहे.

असे आहेत समाज निहाय मतदार -

  1. मराठा समाज - ३ लाख ५९ हजार ८५५
  2. अनु. जमाती - २ लाख ५२ हजार १८६
  3. वंजारी समाज - १ लाख ९७ हजार ६६४
  4. मुस्लीम समाज - १ लाख ९६ हजार १६५
  5. कुणबी समाज - १ लाख ९० हजार ३७
  6. अनु. जाती - १ लाख ८३ हजार ३०५
  7. माळी समाज - १ लाख ३२ हजार ९८५
  8. धनगर समाज - ८४ हजार ४९९
  9. लिंगायत समाज - ३ हजार ५९०
  10. आगरी समाज - ८ हजार ५१५
  11. इतर समाज - १ लाख ९४ हजार ९५

Intro:नाशिक लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत मराठा,ओबीसी आणि आदिवासी समाजाची मते निर्णायक ठरणार... सर्व धर्मियांचा देश म्हणून भारताची ओळख आहे..मात्र धर्मनिरपेक्ष देशात आजही निवडणुकित धर्म आणि जातीचा महत्वाचा निकष मानला जातो..नाशिक मधील लोकसभा निवडणुकीत मराठा आणि ओबीसी समाजाची मते निर्णयाक ठरणार आहे.. नाशिक मध्ये उमेदवाराची पात्रता, प्रचाराचे मुद्दे,विकासाचे धोरणं ह्या सोबतच जात आणि धर्म हा निकष देखील महत्वाचा मनाला जातोय हे आजवर झालेल्या निवडणुकीतुन समोर आलं आहे... सहा विधानसभा मतदार संघ म्हणून एक लोकसभा मतदार संघ असून, ह्याती तीन जगा भाजप ,दोन जागा सेनेकडे तर एक जागा कॉग्रेस पक्षा कडे आहे... ह्यात नाशिक मध्यतील 17 टक्के मुस्लिम, नाशिक पूर्व मधिल 35 टक्के मराठा, नाशिक पश्चिम मधील 28 टक्के ओबीसी,सिन्नर मधील 39 टक्के वांजरी आणि इगतपुरी मधील 54 टक्के आदिवासी मतांचा एक गठ्ठा मतदान निर्णयक ठरणार असा अंदाज आहे.... एक नजर टाकूयात नाशिक लोकसभा मतदार संघातील निर्णयाक मतदानावर 1) मराठा -3 लाख 59 हजार 855 2) अनु जमाती- 2 लाख 52 हजार 186 3) वंजारी -1 लाख 97 हजार 664 4) मुस्लिम- 1 लाख 96 हजार 165 5) कुणबी -1 लाख 90 हजार 37 6)अनु जाती - 1 लाख 83 हजार 305 7) माळी-1 लाख 32 हजार 985 8) धनगर-84 हजार 499 9) लिंगायत 03 हजार 590 10) आगरी 8 हजार 525 11) इतर -1 लाख 94 हजार 95

Body:नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे रिंगणात असून राष्ट्रवादी कॉग्रेस कडून समीर भुजबळ उमेदवारी करत आहे तसेच भाजपचे माजी आमदार माणिकराव कोकाटे देखील बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी करण्याच्या तयारीत आहे..वंचित आघाडी कडून पवन पवार यांना उमेदवारी जाहीर झाली असून,नाशिक मधून मराठा मोर्चाचे नेतृत्व करणारे करणं गायकर यांनी देखील निवडणूक लढवण्यासाठी तयारी केली आहे ... बाईट किरणं अग्रवाल -लोकमत संपादक ( राजकीय विश्लेषक) बाईट च्या साइड विंडो मध्ये मतदानाचे स्टॉक व्हिजव्हल वापरने...

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.