नाशिक : 5 नोव्हेंबर रोजी कार्तिक एकादशीला तुळशी (Kartik Ekadashi on November 5) विवाहाचा मुहूर्त आहे. तुळशी विवाह आनंदाने संपन्न केले तर, घरातील क्लेश नाहिशे होतात. पती-पत्नीत प्रेम भाव निर्माण होतात. ज्यांचे विवाह जुळण्यास अडचणी येतात, त्या दूर होऊन त्यांचे विवाह ठरण्यास मदत होते. तसेच अनेक पुण्यफळ या तुळशी विवाह व्रताचे सांगितले आहे,असं महंत अनिकेत देशपांडे यांनी म्हटलं आहे. 5 नोव्हेंबर पासुन घरोघरी तुळशी विवाह सुरु होत आहे. Tulsi Vivah Benefits
तुळशी विवाह कथा : पौराणिक कथेनुसार वृंदा ही सती गेल्यानंतर तिच्या राखेतून जे झाड उत्पन्न झाले ते म्हणजे तुळशी, आणि ही तुळशी भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. तुळशी म्हणजे तुळशी वनस्पतीच्या रोपाचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण यांच्याशी विवाह प्रबोधिनी एकादशीपासून करण्याची प्रथा आहे. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात,तेव्हा तुळशीशी लग्न लावतात.
तुळशी मुहूर्त : पंचांगानुसार 5 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 06.08 वाजता द्वादशी तिथी सुरू होईल. द्वादशी तिथी 6 नोव्हेंबर (रविवार) संध्याकाळी 05:06 मिनिटांपर्यंत राहील. तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त 6 नोव्हेंबरला दुपारी 01:09 ते 03:18 पर्यंत राहील. Tulsi Vivah Benefits