नाशिक : नाशिकच्या बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील रहिवाशी ( Resident of Jaikheda ) असलेले व भारतीय सैन्य दलात कार्यरत ( Working in Indian Army ) असलेले जवान सारंग अशोक अहिरे वय- ३२ यांचा आसाम येथे दुर्दैवी मृत्यू झाला. (Jaikheda jawan Jawan Sarang Ahire ) पण मृत्यूचे अधिकृत कारण समजू शकले नाही. त्यांच्या मृत्यूची माहीती मिळताच संपुर्ण गाव व परिसरात शोककळा पसरली. ( Jaikheda jawan dies in Assam )
शासकीय इतमामात निरोप देणार : जायखेडा गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सारंग यांनी अतिशय हालकीच्या परिस्थिती आपले शिक्षण पूर्ण केले. दहावी पर्यंतचे शिक्षण जायखेडा जनता इंग्लिश स्कुल मध्ये घेतले व नंतर बारावीचे शिक्षण ताहाराबाद येथे पूर्ण करून सैन्यदलात भरती (Army recruitment ) झाले आणि पुणे येथे सेवेला प्रारंभ झाला. सारंग हे भारतीय सैन्य दलात 103 इंजिनिअरकडे गेल्या 11 वर्षांपासून कार्यरत होते. सारंगच्या मृत्यूची बातमी सकाळी बागलाण तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली, या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली. सारंग अहिरे ( Jawan Sarang Ahire dies ) याचे पार्थिव आज दुपारपर्यंत जायखेडा येथे पोहचण्याचा अंदाज असून, त्यांना शासकीय इतमामात गावावरच अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. सारंगच्या पश्चात आई, वडील, भाऊ, भावजाई, असा परिवार आहे.
श्रद्धांजली : नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील जायखेड्याचे भूमिपुत्र जवान सारंग अशोक अहिरे हे देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना शहीद झाल्याची बातमी कळली.अतिशय दुःख झाले. शेतकरी कुटुंबातील असलेले शहीद जवान सारंग अहिरे यांनी अत्यंत हलाकीच्या परिस्थितीतून आपले शिक्षण पूर्ण करत भारतीय सैन्यदलात कार्यरत झाले होते. आपल्या भारतमातेच्या सेवेचे कर्तव्य बजावत असताना त्यांना आसाम येथे वीरमरण आले. त्यांच्या निधनाने भारत मातेने एक वीर सुपुत्र गमावला आहे. मी व माझे कुटुंबीय त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो, अशाप्रकारे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ शोक Former Deputy Chief Minister Chhagan Bhujbal व्यक्त केला.
भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट : अरुणाचल प्रदेशमध्ये (Arunachal Pradesh) भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाल्याची बातमी समोर आली. या झटापटीत दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. तवांगजवळ (Tawang) नुकतीच ही झटापट झाली. भारतीय जवानांनी चीनला (China) चोख प्रत्युत्तर दिले आहे. याबाबत अद्याप भारतीय लष्कराकडून (Indian Army) अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. याआधी ऑक्टोबर 2021 मध्ये अरुणाचल प्रदेशातील यांगसे येथे दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये वाद झाला होता.