नाशिक - आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमधून काँग्रेसला आणखी खिंडार पडण्याची शक्यता आहे. इगतपुरीच्या विद्यमान आमदार निर्मला गावित या भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. निर्मला गावित यांनी सलग २ वेळा इगतपुरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या कन्या नाशिक जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष आहेत.
नाशिक जिल्ह्यात गावितांचे चांगले वर्चस्व असून ग्रामीण भागात त्यांनी अनेक चांगली कामे केली आहेत. त्यामुळे जनतेचा त्यांच्यावर चांगला विश्वास आहे. मागील विधानसभा निवडणुकीत निर्मला गावित यांनी शिवसेनेचे शिवराम झोले यांचा पराभव केला होता. आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर जर गावित यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली, तर काँग्रेसला नाशिक जिल्ह्यात मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे.
2014 इगतपुरी विधानसभा निवणूक निकाल आकडेवारी
निर्मला गावित, काँग्रेस - ४९१२८
शिवराम झोले, शिवसेना - ३८७५१