नाशिक - जगभरातील काही देशात 15 डिसेंबर हा दिवस जागतिक चहा ( World Tea Day ) दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र, चहाचा व्यापार आणि चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 21 मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिवस ( International Tea Day ) साजरा केला जातो. आजच्या दिवसाचा उद्देश चहाच्या व्यापाराला प्रोत्साहन देणे आणि त्याच्या नैतिक आणि टिकाऊ उत्पादनावर लक्ष केंद्रीत करणे हा आहे.
चहाचे स्वरूप बदलतं - दैनंदिन जीवनात चहाचं महत्व वाढतं चालले आहे. आता आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांचा ग्रीन टी, ब्लॅक टीकडे कल अधिक वाढत चालला आहे. चहाचं सेवन प्रमाणात केलं तर ते अमृताचे कार्य करते असं तज्ज्ञांचे मत आहे.
चहा भारतात कधी आला - आसामच्या पर्वत भागात 1824 सालच्या दरम्यान चहाचे पानं सापडली. त्यानंतर इंग्रजांनी 1836 सालापासून चहाचे उत्पादन सुरु केलं. सुरुवातीला यासाठी चीनमधून चहाचे बी मागवले जायचे. त्यानंतर आसामच्या भागातील चहाच्या बियांचा वापर सुरु झाला. भारतातील चहाचे उत्पादन हे ब्रिटनमधील चहाची मागणी पूर्ण करण्यासाठी केलं जायचं. आज चहा भारतातील सर्वात स्वस्त आणि लोकप्रिय पेय आहे. आसामचा चहा सर्व जगभर प्रसिध्द आहे. भारतील अनेक नागरीकांची सकाळ चहा पिल्यानंतर होते. भारत, चीन, केनिया आणि श्रीलंका हे जगातील प्रमुख चहा उत्पादक देश आहेत. याव्यतिरिक्त, बांग्लादेश, यूगांडा, इंडोनेशिया, टांझानिया आणि मलेशिया या देशातही चहाचे उत्पादन घेतले जाते. चीन हा जगातील सर्वात मोठा चहाचा निर्यातक आहे. भारतातही चहाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं. पण स्थानिक स्तरावर त्याचं सेवनही मोठ्या प्रमाणात केलं जातं. भारतातील चहाच्या एकूण उत्पादनापैकी 80 टक्के उत्पादन हे भारतातच सेवन केलं जातं.
काय आहेत चहाचे फायदे - चहामध्ये एंटीजन असतात, जे एंटी-बॅक्टेरियल क्षमता प्रदान करतात. चहामध्ये असलेला फ्लोराईड हाडांना मजबूत करतो व दातांना कीड लागण्यापासून थांबवतो. चहामध्ये कैफिन आणि टैनिन असतो, जो शरीराला स्फुर्ती प्रदान करतो. चहामध्ये असलेला अमिनो-एसिड डोक्याला शांत व चपळ ठेवण्यास मदत करतो. चहा हे म्हातारपण वाढण्याचा वेग कमी करतो, तसेच शरीर वाढीचे नुकसाना पासून वाचवतो. चहा शरीरातील एंटी- ऑक्सिडेन्स इम्युन सिस्टिम व्यवस्थित ठेवतो.
हेही वाचा - Indrani Mukherjee Book : सात वर्षानंतर सुटका झालेली इंद्राणी मुखर्जी लिहिणार पुस्तक, काय उलगडणार रहस्ये?