नाशिक - देवळाली येथील स्कुल ऑफ आर्टिलरीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भारतीय सैन्य दलाच्या तोफांचा थरार पाहायला मिळाला. यावेळी भारतीय सैन्य दलाच्या ताकदीची अनुभूती नाशिककरांनी अनुभवली.
हेही वाचा - 'देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना निधी दिला नाही; मात्र, असलेला निधी पळवून नेला'
यावेळी झालेल्या प्रात्यक्षिकांमध्ये लक्षभेदी रॉकेट्स, मिसाईल, आधुनिक हेलिकॉप्टर, लढाऊ हेलिकॉप्टर, विशेष म्हणजे अत्याधुनिक पद्धतीने तयार केलेल्या स्वयंचलित अल्ट्रा लाईट होवीतजर एम-७७७ या तोफेचा थरार ही पहायला मिळाला. शत्रूचा अचूक वेध घेत या तोफांनी उपस्थितांची मने जिंकली.
हेही वाचा - 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकाची एकही प्रत विकली जाणार नाही - छगन भुजबळ
लष्कराचे रणगाडे, रॉकेट्स, मिसाईल लक्ष्य प्राप्ती रडार, मानवरहित विमान यांच्यासह लष्कराच्या हायटेक ताकदीचे दर्शन घडले. अत्याधुनिक अल्ट्रालाईट होवितजर एम-777, स्वयंचलित के 9 वज्र यासोबतच लढाऊ हेलिकॉप्टर चेतक आणि चिता यांच्या हवाई कसरतीने उपस्थितांची मने जिंकली. यावेळी लेफ्टनंट जनरल दिपीनदर सिंह आहुजा अति विशेष सेवा मेडल चीफ ऑफ स्टाफ, दक्षिण कमांड आणि लेफ्टनंट जनरल आर. एस. सलारीया यांच्यासह लष्कराचे अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.