ETV Bharat / state

परिस्थिती सुधारली नाही तर कठोर निर्णय घ्यावा लागेल; नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचे संकेत

author img

By

Published : Mar 12, 2021, 4:34 PM IST

Updated : Mar 12, 2021, 5:13 PM IST

नाशिक जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. महाराष्ट्र राज्यात ज्या जिल्हयांमध्ये रूग्णसंख्या वाढत आहे अशा ‘टॉप टेन’ जिल्हयांमध्ये नाशिकचा पाचवा क्रमांक लागतो. गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमध्ये रूग्णसंख्येने एक हजाराचा टप्पा पार केला असून यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

नाशिक जिल्हाधिकारी
नाशिक जिल्हाधिकारी

नाशिक - जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अंशतः लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मात्र, ही बाब अद्यापही नागरीकांनी गांभीर्याने घेतली नसून येत्या रविवारपर्यंत परिस्थितीचा आढावा घेऊन कठोर निर्णय घ्यावा लागेल, असे संकेत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत.

परिस्थिती सुधारली नाही तर कठोर निर्णय घ्यावा लागेल

कोरोना 'टॉप टेन’ जिल्हयांमध्ये नाशिकचा पाचवा क्रमांक
नाशिक जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. महाराष्ट्र राज्यात ज्या जिल्हयांमध्ये रूग्णसंख्या वाढत आहे अशा ‘टॉप टेन’ जिल्हयांमध्ये नाशिकचा पाचवा क्रमांक लागतो. गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमध्ये रूग्णसंख्येने एक हजाराचा टप्पा पार केला असून, यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. परंतू निर्बंध लादत असताना अर्थचक्रही सुरू राहीले पाहीजे याचा विचार करून जिल्हयात सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत बाजारपेठा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरीही सायंकाळी ७ वाजल्यानंतर काही दुकानदार दुकाने सुरू ठेवत असून नागरिकदेखील बिनधास्तपणे वावरताना दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

हेही वाचा- बेळगावात शिवसेनेच्या रुग्णवाहिकेवर कन्नडिगांचा हल्ला, घटनास्थळी तणाव

परिस्थिती सुधारली नाही तर कठोर

गेल्यावर्षी आपण या परिस्थितीतून गेलो आहोत. यावर्षी मागच्यापेक्षा अधिक मोठया प्रमाणावर कोरोनाची लाट दिसून येत आहे. याकरीता काही निर्बंध लावण्यात आले आहे. खरे म्हणजे पूर्ण लॉकडाऊन करणे हे अगदी सहज सोपे असतांना नागरीकांचे हाल होऊ नये आणि अर्थचक्रही सुरू राहावे याचा सारासार विचार करून कडक निर्बंध लादण्यात आलेले नाही. सकाळी ७ ते सायंकाळी ७ बाजारपेठा सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र, नागरिक कोरोनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करताना दिसून येत असून नागरिकांनी नियम पाळले नाही आणि परिस्थिती सुधारली नाही तर कठोर निर्णय घ्यावा लागेल असे संकेत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत.

मृत्यू दर अजून दोन टक्केच
कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. कोरोना मृत्यूदर दोन टक्के आहे. तो शुन्य झालेला नाही. पॉझिटिव्ह रूग्णसंख्या वाढत गेली तर काय होईल हे वेगळे सांगण्याची गरज नाही याचा अनुभव नागरिकांनी घेतला आहे. त्यामुळे कोरोना नियमांचे पालन करून निर्बंध पाळावेत, आपली आणि आपल्या कुटुंबाचीही काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

हेही वाचा- वझेंची एकाच दिवशी दुसऱ्यांदा बदली, नियंत्रण कक्षातून आता नागरी सुविधा केंद्रात

Last Updated : Mar 12, 2021, 5:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.