नाशिक- दिंडोरी तालुक्यातील वणी सापुतारा सुरत रस्त्याचे काम सुरू असल्याने पांडाणे, सुरगाणा, हतगड, पुणेगाव, माळे दुमाला अस्वलीपाडा येथे जाण्यासाठी रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे दुचाकी वाहकांना इतर रस्त्यावरून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
कोरोना विषाणूच्या पाश्वभूमीवर परप्रांतीय मजूर व कारागीर निघून गेल्याने अडीच ते तीन महिन्यांपासून रस्त्याचे काम व पुलाच्या सेंट्रींगची कामे थांबली आहेत. कामे बंद पडल्यामुळे वाहून गेलेल्या पुलाजवळ वाहनचालकांना शेतातून मार्ग काढावा लागत आहे. मात्र, शेतातून जाताना अपघात होत आहे, पर्याय नसल्याने नागरिकांना हे कष्ट सोसावे लागत आहेत.
वणी ते पांडाणे हे अंतर 5 किलोमीटरचे असताना रस्ता वाहून गेल्याने प्रवाशांना पांडाणे, पुणेगाव, माळे दुमाला, अस्वलीपाडा या गावांमध्ये येण्यासाठी 15 ते 20 कि.मी जादा अंतर कापून पर्यायी मार्गाने यावे लागते आहे.