नाशिक - रोहिणी नक्षत्राच्या पावसाने शहर आणि जिल्ह्यात लागोपाठ दुसऱ्या दिवशीही हजेरी लावली आहे. रविवारी जिल्ह्यातील मालेगाव, सटाणा, कळवण यासह अन्य ग्रामीण भागामध्येही मुसळधार पाऊस झाला आहे. रोहिणी नक्षत्राचा पाऊस सुरु झाल्यानंतर, आता शेतकऱ्यांनीही मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे.
ग्रामीण भागांमध्ये खरिपाच्या पेरणीपूर्व कामांना सुरुवात
नाशिक जिल्ह्यामध्ये वैशाख महिन्याच्या उष्णतेने लाही-लाही होत असताना, पुन्हा एकदा पावसाने नागरिकांना सुखद असा अनुभव दिला आहे. यावर्षी वैशाख महिना सुरु होताच मान्सूनपुर्व मोसमी पाऊस सुरू झाला होता. यामुळे वैशाखाची तीव्रता कमी जाणवत होती. परंतु, मागील आठवड्यात वैशाख महिन्याचे ऊन तापत असतानाच 25 तारखेपासून सुरू झालेल्या रोहिणी नक्षत्राच्या पावसाने, शनिवारी संध्याकाळी आणि रविवारी दुपारनंतर जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये हजेरी लावली आहे. शहरामध्ये शनिवारी संध्याकाळी झालेल्या पावसामुळे बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. जिल्ह्यातील मालेगाव सटाणा, कळवणसह सुरगाण्या तालुक्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वरमध्येही हलका पाऊस झाला आहे. रोहिणी नक्षत्राचा पाऊस सुरु झाल्यानंतर मागील वर्षी रब्बीच्या हंगामानंतर शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. या अडचणींवर मात करत शेतकऱ्यांनी ग्रामीण भागामध्ये खरिपाच्या पेरणीपूर्व कामांना आता सुरुवात केली आहे. शेतीची मशागत आणि इतर कामालाही पाऊस पडल्यामुळे सुरुवात झाली आहे.
हेही वाचा - गंगेच्या पात्रात शव वाहण्याचे पाप मोदी सरकारचेच, बाळासाहेब थोरातांचा भाजपवर हल्ला बोल