ETV Bharat / state

नाशकात अवैध मद्यसाठ्यासह ३ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात - दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले

दिंडोरी-वणी रस्त्यावर अवनखेड शिवारात देशी-विदेशी दारूसाठा वाहनासह जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जप्त मुद्देमाल व आरोपीसह पोलीस
जप्त मुद्देमाल व आरोपीसह पोलीस
author img

By

Published : Mar 5, 2020, 8:26 AM IST

नाशिक - दिंडोरी-वणी रस्त्यावर अवनखेड शिवारात 2 लाख 98 हजार 440 रुपयांचा देशी-विदेशी दारूसाठा वाहनासह जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कचरू बबन सोनवणे (वय 40 वर्षे, रा. शिवाजी नगर दिंडोरी) व रतन रामा गुंबाळे (वय 38 वर्षे, रा. पिंपळगाव धुम, ता. दिंडोरी) या दोघांना ताब्यात घेतले आहे.

अवैध मद्यसाठ्यासह ३ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यातअवैध मद्यसाठ्यासह ३ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. 4 मार्च) नाशिकचे पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांच्या आदेशानुसार वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पथकाला अवैध वाहतुकीची माहिती मिळाली. त्यानुसार दिंडोरी ते वणी रस्त्यावर पथकाने सापळा रचला. त्यावेळी जीप (क्र. एम एच 15 ए एच 1676) या वाहनाची तपासणी केली. 1 लाख 48 हजार 440 रुपये किमतीचा देशी-विदेशी मद्यसाठा मिळाला.

या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन आरोपींसह मद्यसाठा व जीप, असा एकूण 2 लाख 98 हजार 440 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हेही वाचा - शेतकऱ्यांना धीर देताना जिल्हा परिषद सभापतींना अश्रू अनावर!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.