नाशिक : राजस्थान येथून गुजरात मार्गे नाशिकमध्ये दाखल झालेल्या 85 उंटांची गुरुवारी सुटका केल्या नंतर आता पुन्हा मगमला बागेतून 29 उंट ॲनिमल वेल्फेअरच्या सदस्यांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना चुंचाळे शिवारातील पांजरपोळा संस्थेत निवारासाठी ठेवण्यात आले आहेत. राजस्थानमधून दोन दिवसात तब्बल 111 उंट आल्याने एवढ्या मोठ्या संख्येने उंट येण्याची ही पहिली वेळ आहे. हे उंट हैदराबाद येथे का पाठवले जात होते असा प्रश्न आहे उपस्थित होत आहे. याबाबत पोलिसांकडून ठोस माहिती मिळाली नाही. मात्र, ॲनिमल वेल्फेअरकडून हे उंट कत्तलीसाठी पाठवले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे..
कारवाई का केली नाही : महाराष्ट्रात एकापाठोपाठ एक असे 111 उंट दाखल झालेत,धुळे, नाशिक ग्रामीण पोलिसांनी एवढ्या संख्येत उंट जात असताना चौकशी देखील केली नसल्याचे ॲनिमल वेल्फेअरच्या सदस्यांनी म्हटले आहे. नाशिक शहर पोलिसांकडूनही कारवाई का झाली नाही असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हे सर्व उंट पांजरपोळा प्रशासनाशी संपर्क साधत निवारा देण्याची विनंती केली. पांजरपोळा संस्थेने होकार दिल्या नंतर त्यांना चुंचाळे येथे निवारा शेडमध्ये ठेवण्यात आले आहे .
एक उंटचा मृत्यू : राजस्थान येथून दहा कुटुंब टप्प्याटप्प्याने 112 उंट घेऊन प्रवास करत होते. प्रवास करते वेळी त्यांनी नाशिकच्या तपोवन परिसरात आसरा घेतला होता. एक हजार किलोमीटरचा प्रवास करून आल्या मुळे यातील एका उंटाचा मृत्यू झाला. एवढ्या मोठ्या संख्येने उंट नेमकी कुठे घेऊन जात होते. याबाबत विचारणा केली असता त्यांनी वेगवेगळे उत्तर दिल्याचे ॲनिमल वेल्फेरच्या सदस्यांनी सांगितले.
पोलिसांचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र : नाशिकच्या पंचवटी परिसरातील तपोवन झोपडपट्टीतील काही लोकांनी अचानकपणे अनाधिकृतपणे, विनापरवाना सुमारे 70 ते 80 उंट आलेले आहेत. त्यातील काही उंट हे आजारी आहे ,अशी माहिती मिळाली होती. उंटाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्यांना औषध उपचार, त्यांची वैद्यकीय तपासणी होऊन त्यांच्यावर औषध उपचार होण्याकरिता योग्य ती कायदेशीर कारवाई करावी असे, पत्र पशुवैद्यकीय अधिकारी यांना आडगाव पोलिसांनी दिले आहे.
राज्यपालांकडून दखल : राजस्थानमधून उंटाची तस्करी होत असल्याची माहिती राजस्थानमधील एका सामाजिक संस्थेने महाराष्ट्राच्या राज्यपालांना कळली. त्यानंतर त्याबाबत दक्षतेचे पत्र राज्यपालांरांकडून पशु कल्याण विभाग, जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले गेले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाची बैठक घेतली. या बैठकीतनंतर उंट ताब्यात घेतले आहेत. या घडामोडींना थेट राजस्थानमधून वेग आला आहे. हे उंट नेमके कुठे? कशासाठी नेण्यात येत होते याची कसून चौकशी होणार असल्याचे दिसून येत आहे.
|