ETV Bharat / state

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे हायव्होल्टेज वीज पुरवठा; घरातील इलेक्ट्राॅनिक वस्तू जळाल्या - वस्तूंमध्ये

श्रीराम कुंज सोसायटी मधील कुणाच्या घरातील टीव्हीचा सेट टॉप बॉक्स तर कुणाच्या घरातील चार्जर, मोबाईल फोन, मिक्सर, फ्रीज जळाल्या आहे. हायव्होल्टेज मुळे घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये स्फोट होऊन घरातील वस्तू जळाल्याच्या द्वारका परिसरात घडली आहे.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jul 2, 2019, 5:41 PM IST

नाशिक - हायव्होल्टेजमुळे घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये स्फोट होऊन घरातील वस्तू जळाल्याच्या घटना द्वारका परिसरात घडल्या आहेत. त्यामुळे द्वारका येथे श्रीराम कुंज सोसायटीमधील नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला, तसेच आर्थिक नुकसानही झाले.

श्रीराम कुंज सोसायटीमधील कुणाच्या घरातील टीव्हीचा सेट टॉप बॉक्स तर कुणाच्या घरातील चार्जर, मोबाईल फोन, मिक्सर, फ्रीज जळाले. तीस वर्षांपूर्वीचा असणारा डीपी बदलवण्यात यावा म्हणून सोसायटीतील नागरिकांनी महावितरणाला वारंवार अर्ज दिले. मात्र, महावितरणच्या निष्काळजीपणामुळे सोसायटीमधील नागरिकांना विनाकारण हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

श्रीराम कुंज सोसायटीमध्ये अचानक झालेल्या या हायव्होल्टेजच्या स्फोटामुळे नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सर्वच नागरिकांच्या घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळाल्याने नागरिकांमध्ये महावितरणविरोधात रोष व्यक्त केला आहे.

Intro:अचानकपणे हायव्होल्टेज वीज पुरवठा होऊ लागल्याने द्वारका येथे श्रीराम कुंज सोसायटी मधील नागरिकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला अचानक झालेल्या हायव्होल्टेज मुळे घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये स्फोट होऊन घरातील वस्तू जळाल्याच्या घटना घडल्याय

Body:श्रीराम कुंज सोसायटी मधील कोणाच्या घरातील टीव्हीचा सेट टॉप बॉक्स तर कुणाच्या चार्जर ,मोबाईल फोन ,मिक्सर ,फ्रीज झाल्याच्या घटना घडल्या तीस वर्षांपूर्वीच्या असणारी ही डीपी बदला म्हणून महावितरणाला वारंवार अर्ज केल्याच सोसायटीतील नागरिकांनी सांगितले महावितरणच्या निष्काळजीपणामुळे सोसायटीमधील नागरिकांना विनाकारण हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय

Conclusion:श्रीराम कुंज सोसायटी मध्ये अचानक झालेल्या या हायव्होल्टेज च्या स्फोटामुळे नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झालं सर्वच नागरीकाच्या घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.