ETV Bharat / state

शिवसेनेच्या हेमंत गोडसेंचा नाशकातून तर भाजप उमेदवार डॉ. भारती पवारांचा दिंडोरीतून उमेदवारी अर्ज दाखल

नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार डॉ. भारती पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

हेमंत गोडसे आणि भारती पवार यांचा लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल
author img

By

Published : Apr 8, 2019, 8:58 PM IST

नाशिक - शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून तर भाजप उमेदवार डॉ. भारती पवार यांनी दिंडोरी मतदारसंघातून एकत्रित जिल्हाधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी नाशिकच्या बी. डी. भालेकर ग्राऊंडपासून जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत भव्य शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

हेमंत गोडसे आणि भारती पवार यांचा लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल

यावेळी जय भवानी, जय शिवाजीच्या जय घोषणाने परिसर दुमदुमून गेला होता. हजारोंच्या संख्येने शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते पक्षाचे झेंडे, बॅनर घेऊन रॅलीत सहभागी झाले होते. उमेदवारांचे अर्ज भरताना पालकमंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री दादा भुसे, शिवसेनेचे संजय राऊत यांच्यासह आमदार राजाभाऊ वाजे, बबनराव घोलप, सीमा हिरे, बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, राहुल आहेर यांच्यासह शहर व जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

देशाला चांगले नेतृत्व मिळण्यासाठी मतदार मला संधी देतील - हेमंत गोडसे

ग्रामीण भागात प्रचारावर जोर देत असून मागील ४ वर्षात चांगले काम केलेले आहे. देशाला चांगले नेतृत्व मिळावे म्हणून यावेळीसुद्धा मतदार मला संधी देतील, असा विश्वास आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे फरक पडणार नाही. आतापर्यंतच्या नाशिकच्या इतिहासात मतदारांनी राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराला संधी दिली आहे. याही वर्षी असे होईल, असे मला विश्वास असल्याचे शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे यांनी म्हटले आहे.

मागील निवडणुकीत भुजबळांवर कोणतेही आरोप नसताना त्यांचा पराभव झाला होता. यावेळी मात्र ते कुठे आणि कुठल्या कारणासाठी गेले होते हे मतदारांना चांगल्या प्रकारे माहीत असल्याचे म्हणत खासदार गोडसे यांनी भुजबळांवर अप्रत्यक्ष टीका केली.

ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सोडवणार - भारती पवार

भाजप खासदार हरिश्चंद्र चव्हाण बंडखोरी करणार नाही असा मला विश्वास आहे. ते आमचे मार्गदर्शक असून ते आमच्या सोबत आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मला ग्रामीण भागातील प्रश्नाची जाण असून पाण्याचा मुख्य प्रश्न आहे. चांदवड, मनमाड, नांदगाव, येवला आदी भागातील पाण्याचा प्रश्न सोडवणार. तसेच कांदा आणि द्राक्ष अधिक निर्यात होतील, यावर जोर देणार असल्याचे यावेळी भारती पवार यांनी म्हटले.

Intro:Body:

नाशिक-गोडसे,पवार यांचा अर्ज दाखल..

Inbox

    x

KAPIL PRAKASH BHASKAR

5:42 PM (1 hour ago)

to me, Kapil

नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे,तर दिंडोरी मतदारसंघातील भाजप उमेदवार डॉ भरती पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल...

नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे,तर दिंडोरी मतदारसंघातील भाजप उमेदवार डॉ भारती पवार यांनी एकत्रित उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी यांच्या कडे दाखल केला,ह्या वेळी नाशिक च्या बी डी भालेकर ग्राउंड पासून जिल्हाधिकारी कार्यालय पर्यन्त भव्य शक्तीप्रदर्शन करण्यात आलं, ह्या जय भवानी, जय शिवाजी च्या जय घोषणानं परिसरत दुमदुमून गेला होता, हजारोच्या संख्येने शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते पक्षाचे झेंडे बॅनर घेऊन रॅलीत सहभागी झाले होते,उमेदवारांचे अर्ज भरतांना पालकमंत्री गिरीश महाजन,राज्यमंत्री दादा भुसे,शिवसेनेचे संजय राऊत यांच्या सह आमदार राजाभाऊ वाजे,बबनराव घोलप,सीमा हिरे,बाळासाहेब सानप,देवयानी फरांदे,राहुल आहेर यांच्या सह शहरातील जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते...

खासदार हेमंत गोडसे-शिवसेना उमेदवार

ग्रामीण भागात प्रचारावर जोर देत आहे,मागील चार वर्षात चांगले काम केलेले आहे,देशाला चांगलं नेतृत्व मिळावं म्हणून ह्या वेळी पण मतदार मला संधी देतील असा विश्वास आहे.भाजपचे बंडखोर उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्या अपक्ष उमेदवारी मुळे फरक पडणार नाही,आता पर्यन्त च्या नाशिकच्या इतिहासात मतदारांनी राष्ट्रीय पक्षच्या उमेदवाराला संधी दिली आहे ह्याही वर्षी असे होईल असे मला विश्वास असल्याचे शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे म्हटलं आहे..मागील निवडणूकीत भुजबळांवर कुठलेही आरोप नसतांना त्यांचा परावभ झाला होता,ह्या वेळी मात्र ते  कुठे आणि कुठल्या कारणा साठी गेले होते हे मतदारांना चांगल्या प्रकारे माहीत असल्याच म्हणत खासदार गोडसे यांनी भुजबळांवर अप्रत्यक्ष टीका केली..

भारती पावर- भाजप उमेदवार दिंडोरी मतदारसंघ

भाजप खासदार हरिश्चंद्र चव्हाण बंडखोर करणार नाही असा मला विश्वास आहे, ते आमचे मार्गदर्शन कसून ते आमच्या सोबत आहे,जिल्हा परिषद देच्या माध्यमातून मला ग्रामीण भागातील प्रश्नची जाण असून, पाण्याचा मुख्य प्रश्न आहे,चांदवड,मनमाड,नांदगाव, येवला आदी भागातील पाण्याचा प्रश्न सोडवणार तसेच कांदा आणि द्राक्ष कसे जास्त निर्यात होतील ह्यावर जोर देणार..

टीप फीड मोजो वरून पाठवले आहे...

नाशिक भारती पवार उमेदवारी अर्ज दाखल व्होडिओ

नाशिक गोडसे उमेदवारी अर्ज व्हिडीओ

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.