ETV Bharat / state

येवला तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस, मका व बाजरी पिकांचे नुकसान - heavy rain crop damage yeola

तालुक्यातील कुटे, गुजरखेडे, कुसूर, नगरसूल, अंदरसूल गावांना पावसाने झोडपून काढले आहे. पावसामुळे काढण्यात आलेला मका व बाजरी मातीमोल झाले आहेत. नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

पावसाचे दृश्य
पावसाचे दृश्य
author img

By

Published : Sep 6, 2020, 9:08 PM IST

नाशिक- येवला तालुक्यात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यात मका व बाजरीसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

तालुक्यातील कुटे, गुजरखेडे, कुसूर, नगरसूल, अंदरसूल गावांना पावसाने झोडपून काढले आहे. पावसामुळे काढण्यात आलेला मका व बाजरी मातीमोल झाले आहेत. नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

पावसाचे दृश्य

पावसामुळे टमाटर व इतर भाजीपाला पिकांना देखील मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे, भाज्यांच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे. यावर्षी कांदा बियाणे महाग होते. तरी देखील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने कांद्याची लागवड केली. मात्र, त्यावरही रोगराईचे संकट आले. त्यामुळे, कांदा, टमाटे ही हमखास उत्पन्न देणारी पिके हातची जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

हेही वाचा- तोंडाला ऑक्सिजन मास्क लावून मनसेचे बिटको रुग्णालयासमोर आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.