नाशिक (मनमाड) - एका दिवसाच्या विश्रांतीनंतर परतीच्या पावसाने मनमाड, येवला, चांदवड परिसरात पुन्हा हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटासह सोमवारी रात्री 8 वाजल्यापासून पावसाला सुरुवात होऊन रात्री उशिरापर्यंत जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. तर, शेतात पाणी तुंबल्यामुळे पिकांचेही नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे नागरिक व शेतकरी हैराण झाले असून आता तरी थांबरे बाबा, अशी म्हणायची वेळ आली आहे.
हेही वाचा - पीएमसी घोटाळा : आरबीआयच्या इमारतीबाहेर खातेधारकांची 'काळी दिवाळी'
परतीच्या पावसाने राज्यभरात हाहाकार माजवला आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. यामुळे शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून द्राक्ष बाग, मका, बाजरी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शनिवारी एक दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी संध्याकाळी जोरदार हजेरी लावली होती.
हेही वाचा - माहुल प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला वर्ष पूर्ण; मृतांना वाहिली श्रद्धांजली
विजेच्या कडकडाटासह मनमाड शहर व परिसरात जोरदार पाऊस झाला. यामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले होते. तर, अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली होती. आता पाऊस नको, असे बोलायची वेळ शेतकऱ्यांसह नागरिकांवर आली आहे.