नाशिक - परतीच्या मुसळधार पावसाने मनमाड शहरासह नांदगाव तालुक्यातील अनेक गावांना झोडपले. त्यामुळे शेतकऱ्यांची बाजरी, मका या पिकांचे नुकसान झाले आहे, तर शेतात पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान आर्थिक नुकसान झाले आहे.
शनिवारी दुपारपासून पावसाला सुरुवात झाली, तर रात्रभर पावसाचा जोर सुरूच होता. अनेक शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला मका व बाजरी पावसात भिजून खराब झाली. कांद्याचे रोप आणि द्राक्षे बागांना देखील या पावसाचा फटका बसला.
पुणे वेधशाळेने 19 ते 21 राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. रविवारी देखील ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. उद्या सोमवारी असाच पाऊस झाला, तर त्याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता आहे.