ETV Bharat / state

आरोग्यमंत्र्यांची अचानक मालेगावला भेट; सामान्य रुग्णालयासह महापालिकेच्या रुग्णालयांची केली पाहणी

कोरोनाने मालेगाव शहर परिसरात थैमान घातले आहे. रोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मालेगावला अचानक भेट देऊन सामान्य रुग्णालायासोबत महापालिकेच्या रुग्णालयांची पाहणी केली.

Rajesh Tope Malegaon Public Advice
राजेश टोपे मालेगाव जनता सल्ला
author img

By

Published : Apr 6, 2021, 3:39 PM IST

नाशिक - कोरोनाने मालेगाव शहर परिसरात थैमान घातले आहे. रोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मालेगावला अचानक भेट देऊन सामान्य रुग्णालायासोबत महापालिकेच्या रुग्णालयांची पाहणी केली.

प्रतिक्रिया देताना आरोग्य मंत्री राजेश टोपे

हेही वाचा - नाशकात 25 दिवसांच्या मिनी लॉकडाऊनला सुरवात; बाजारपेठेत शुकशुकाट

टोपे यांनी नाशिक जिल्ह्याचा धावता दौरा करून काल रात्री कोरोना महामारीच्या परिस्थितीचा आढावा घेतला. अचानक आरोग्यमंत्र्यांनी दौरा केल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर देखील मोठ्या प्रमाणावरती खळबळ उडाली होती.

कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास तातडीने चाचणी करा - आरोग्यमंत्री

गेल्या काही महिन्यांपासून नाशिक जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसून येत आहे. यात आता नाशिक शहरापाठोपाठ मालेगाव शहर देखील पुन्हा एकदा हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल करत आहे. कोरोनाने मालेगाव शहर परिसरात थैमान घातले असून रोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत असल्याची माहिती मिळाल्याने धुळे दौऱ्यावर असलेले आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल रात्री मालेगावला अचानक भेट देऊन सामान्य रुग्णलायासोबत महापालिकेच्या रुग्णालयांची पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसोबत चर्चा करून माहिती घेतली.

सामान्य रुग्णालयात चांगल्या सुविधा मिळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले, मात्र मनपाच्या रुग्णालयात अद्यापही रुग्णांना व्यवस्थित सुविधा मिळत नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. रुग्ण उशिरा येत असल्याने त्यांना व्हेंटिलेटर व ऑक्सिजन लागत आहे. थोडा जरी त्रास होत असेल तर तातडीने तपासणी करून घ्यावी, असे आवाहन टोपे यांनी जनतेला केले.

महापालिका हद्दीत २ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू

सध्या मालेगाव महापालिका हद्दीत २ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, 213 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दरम्यान, कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान वैद्यकीय यंत्रणांसमोर उभे ठाकले आहे, त्यामुळे आता नागरिकांनी देखील यंत्रणांना सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे. अचानक दिलेल्या भेटीत आरोग्यमंत्री टोपे यांनी अधिकाऱ्यांना सूचना करत समस्या तातडीने सोडवण्याचे आदेश दिले.

हेही वाचा - गंगापूर धरणावर फोटो काढताना पाण्यात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.