नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. ज्यात सहभागी होण्यासाठी भारतीय क्रिकेट संघानं पाकिस्तानच्या भूमीवर पाय ठेवण्यास नकार दिला आहे. भारत सरकारकडून परवानगी न मिळाल्यानं BCCI नं हा मोठा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनावर टांगती तलवार आहे. दरम्यान, पाकिस्तानसाठी आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय संघानंतर आता भारतीय अंध क्रिकेट संघानंही पाकिस्तानला जाण्यास नकार दिला आहे. हा संघ पाकिस्तानमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकात सहभागी होणार होता पण भारत सरकारनं सुरक्षेच्या कारणास्तव या संघाला पाकिस्तानात जाण्याची परवानगी दिली नाही. राष्ट्रीय महासंघानं 19 नोव्हेंबर रोजी ही माहिती दिली.
🚨 UPDATES 🚨
— The Khel India (@TheKhelIndia) November 19, 2024
India Blind Cricket Team has withdrawn from T20 World Cup after External Affairs Ministry denied permission to travel Pakistan.
Australia, England & New Zealand Blind Cricket also have also opted out of this tournament! pic.twitter.com/O0qYUrRqlh
पाकिस्तानात जाण्याची परवानगी मिळाली नाही : इंडियन ब्लाइंड क्रिकेट असोसिएशनचे (IBCA) सरचिटणीस शैलेंद्र यादव यांनी पीटीआयला सांगितलं की, अंध क्रिकेट संघाला पाकिस्तानात जाण्याची परवानगी दिली जाणार नाही, असं त्यांना अनौपचारिकपणे कळवण्यात आलं आहे. त्यांचा संघ आज वाघा बॉर्डरवर जाणार होता. मात्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळं ते थोडे निराश झाले आहेत. तसंच त्यांना वेळीच माहिती दिली असती तर निवड चाचण्यांद्वारे संघ निवडण्याच्या प्रक्रियेतून ते वाचले असते, असंही यादव म्हणाले.
भारताचा संघ न आल्यानं काही फरक पडणार नाही : पाकिस्तान ब्लाइंड क्रिकेट कौन्सिलनं गेल्या आठवड्यात स्पष्ट केलं होतं की भारतानं वर्ल्डकपसाठी आपला संघ पाकिस्तानला पाठवाला नाही तरी ही स्पर्धा वेळेवरच होईल. काही फरक पडणार नाही.
INDIAN BLIND TEAM TO WITHDRAW FROM THE T20 WORLD CUP 🇮🇳
— Johns. (@CricCrazyJohns) November 19, 2024
- Ministry of External Affairs denies the permission for the Blind cricket team to travel to Pakistan. [Sports Tak] pic.twitter.com/0FjijfCZwt
भारतीय अंध संघ 3 वेळा चॅम्पियन : 23 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान पाकिस्तानमध्ये अंध T20 क्रिकेट विश्वचषक 2024 चं आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेची ही चौथी आवृत्ती आहे. याआधी अंध T20 क्रिकेट विश्वचषकाचं तीन सत्र झाले असून भारतीय संघानं तिन्ही जिंकले आहेत. भारतीय संघानं 2012 आणि 2017 मध्ये पाकिस्तानला हरवून हे विजेतेपद पटकावलं होतं. त्याच वेळी, 2022 मध्ये भारतीय संघानं अंतिम फेरीत बांगलादेशचा पराभव केला.
हेही वाचा :