नाशिक - पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या रविवारी ख्रिस्ती समाजातर्फे हंगामाचा सण साजरा करण्याची परंपरा आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी ख्रिस्ती बांधवातर्फे येथील संत बार्णबा चर्चमधे हंगामाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी येथे बाजार भरविण्यात आला होता.
हेही वाचा - राज्यपाल कोश्यारींची सत्ता स्थापनेसाठी भाजपला विचारणा
नवीन धान्य आणि पीक येत यातील पहिले उत्पन्न हे देवाला अर्पण करण्याची परंपरा आहे यासाठी ख्रिस्ती बांधवातर्फे दरवर्षी हंगाम सण साजरा करण्यात येतो. याहीवर्षी तो सालाबादप्रमाणे साजरा करण्यात आला. येथील संत बार्णबा चर्चमधे आज विशेष प्रार्थना आयोजित करण्यात आली होती. चर्चचे पाळक यांनी विक्रीसाठी आणलेले भाजीपाला फळ धान्य कडधान्य याला आशीर्वादित करून प्रार्थना केली. यानंतर चर्चच्या आवारातील बाजारपेठमध्ये या सर्व वस्तू लिलाव करून विकण्यात आल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्व वस्तू विकून येणारा पैसा हा चर्चला दान करण्यात येतो. या ठिकाणी सर्व सभासदांच्या वतीने विविध दुकाने थाटण्यात येतात यात खाण्यापिण्याच्या वस्तूचेही दुकाने मांडली जातात. अशा प्रकारे हा हंगामाचा सण साजरा करण्याची शेकडो वर्षांपासून असलेली परंपरा आहे ती याहीवर्षी पाळण्यात आली.
हंगामचा सण दरवर्षी साजरा करण्यात येतो याहीवर्षी तो मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ख्रिस्ती बांधव तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. चर्चमधील तरुण मंडळींनी यावेळी व्हेज आणि नॉनव्हेज या दोन्ही खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले होते. हंगामाचा सण साजरा करणे ही इसवी सन काळापासून सुरू असलेली परंपरा आहे. ती अबाधित ठेवण्याचे काम ख्रिस्ती समाजाच्या वतीने करण्यात येते.
हेही वाचा - राष्ट्रवादीने मंगळवारी बोलावली आमदारांची बैठक; राजकीय घडामोडींना वेग