नाशिक - पाकिस्तानातील आयएसआय या गुप्तहेर संघटनेला भारतीय बनावटीच्या विमानांची गोपीनाय माहिती पुरवणाऱ्या एकाला एटीएसने अटक केली आहे. दीपक शिरसाठ (वय 41) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून तो एचएएलमध्ये असिस्टंट सुपरवायझर आहे.
दीपक परदेशी व्यक्तींच्या संपर्कात असून भारतीय बनावटीच्या विमानांची व हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या कारखान्या संदर्भातील बाहेर देत असल्याची माहिती नाशिकच्या दहशतवाद विरोधी पथका(एटीएस)ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एटीएसने संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
ओझर येथील भारतीय बनावटीची विमाने बनवणाऱ्या 'हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड' या कंपनीमधील हा कर्मचारी पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेच्या संपर्कात होता. तो भारतीय बनावटीच्या विमानांची संवेदनशील तांत्रिक माहिती त्यांना देत होता. आरोपीच्या ताब्यातून एटीएसने 3 मोबाइल, ५ सिमकार्ड, दोन मेमरी कार्ड जप्त केले आहेत. हे सर्व साहित्य विश्लेषणासाठी फॉरेन्सिक लॅबोरेटरीत पाठवण्यात आले आहेत. आरोपीला दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.