ETV Bharat / state

नाशिकमध्ये 'हा खेळ अक्षरांचा' या प्रदर्शनीचे आयोजन; मराठी शब्द संस्कृतीचे होत आहे दर्शन

author img

By

Published : Dec 29, 2019, 4:31 AM IST

Updated : Dec 29, 2019, 5:49 AM IST

शब्दाचे एखादे अंग योग्य प्रमाणात कमी-जास्त करून निर्माण केलेली शब्दांच्या आशयाची चित्र निर्मिती, म्हणजेच मूळ शब्दांचा आशय वाढविण्यासाठी केलेला समतोल वापर याला एक्सप्रेसिव्ह टायोपोग्राफी म्हणतात, असे अक्षर रचनाकार सुनील धोपावकर यांनी यावेळी सांगितले

nashik
अक्षर प्रदर्शनाचे दृश्य

नाशिक- एक्सप्रेसिव्ह टायोपोग्राफी या भन्नाट कलाकृतीतून मराठी शब्दांना बोलके करण्याचा प्रयत्न प्रसिद्ध अक्षर रचनाकार सुनील धोपावकर यांनी केला आहे. 'हा खेळ अक्षरांचा' या प्रदर्शनीच्या माध्यमातून त्यांनी दोनशेहून अधिक शब्द रेखाटले आहेत. मराठी शब्दांचा अर्थ सहज समजावा यासाठी त्यांनी अनोखे रेखाटण केले आहे.

अक्षर प्रदर्शनीचे दृश्य

शब्दाचे एखादे अंग योग्य प्रमाणात कमी-जास्त करून निर्माण केलेली शब्दांच्या आशयाची चित्र निर्मिती, म्हणजेच मूळ शब्दांचा आशय वाढविण्यासाठी केलेला समतोल वापर याला एक्सप्रेसिव्ह टायोपोग्राफी म्हणतात, असे अक्षर रचनाकार सुनील धोपावकर यांनी यावेळी सांगितले. या प्रदर्शनातील गुबगुबीत, डोळे, व्यसन, गणपती, बुद्धिबळ, आई, टेप, झुरळ, दुरुस्ती, पटेल, बेडूक अशी शेकडो अक्षरे लक्ष वेधून घेत होती. विशेष म्हणजे, प्रत्येक अक्षरात वेगळेपण असल्याचे दिसून आले. यावेळी गंगापूर रोड येथील कुसुमाग्रज स्मारकात सुरू असलेले हे प्रदर्शनी बघण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत आहे. दिनांक 2 जानेवारी पर्यंत नागरिकांसाठी हे प्रदर्शन सुरू राहणार असून या पुढे महाराष्ट्रतील प्रमुख शहारामध्ये प्रदर्शनी भरवण्याचा मानस असल्याचे धोपावकर यांनी सांगितले.

हेही वाचा- वाहनाने दिलेल्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू

Intro:"हा खेळ अक्षरांचा"ह्या प्रदर्शनांतून मराठी शब्द संस्कृतीचे दर्शन.

Body:एक्सप्रेसिव्ह टायोपोग्राफी या भन्नाट कलाकृतीतून मराठी शब्दांना बोलकी करण्याचा प्रयत्न प्रसिद्ध अक्षररचनाकार सुनील धोपावकर यांनी केला आहे ,हा खेळ अक्षरांच्या या प्रदर्शनाचं माध्यमातून त्यांनी दोनशेहून अधिक शब्द रेखाटलेत,या शब्दांचा अर्थ सहज समजावा यासाठी त्यांनी अनोखे रेखाटण केलं आहे...

एक्सप्रेसिव्ह टायोपोग्राफी म्हणजे काय तर.. शब्द आणि चित्र किंवा शब्दाचे एखादे अंग योग्य प्रमाणात कमी-जास्त करून निर्माण केलेली शब्दांच्या आशयाच्या चित्र निर्मिती, म्हणजेच मूळ शब्दांचा आशय वाढविण्यासाठी केलेला समतोल वापर म्हणजेच
एक्सप्रेसिव्ह टायोपोग्राफी असल्याचं अक्षररचनाकार सुनील धोपावकर यांनी सांगितले...

या प्रदर्शनातील गुबगुबीत,
डोळे,व्यसन,गणपती,बुद्धिबळ,आई,टेप,झुरळ,दुरुस्ती,पटेल,बेडूकप,टक्कर,प्रतिबिंब,पुरुष, चावी,मेणबत्ती,ब्लेड अशी शेकडो अक्षरं लक्ष वेधून घेतात विशेष म्हणजे प्रत्येक अक्षरात वेगळे पण असल्याचे दिसून येते..गंगापूर रोड येथील कुसुमाग्रज स्मारकात सुरू असलेलं हे प्रदर्शन बघण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत आहे...दिनांक 2 जानेवारी पर्यंत नागरिकांसाठी हे प्रदर्शन सुरू राहणार असून ह्या पुढे महाराष्ट्रतील प्रमुख शहारा मध्ये प्रदर्शन भरवण्याचा मानस असल्याचे धोपावकर यांनी सांगितले...
बाईट
सुनील धोपवकार-अक्षररचनाकार ( व्हाइट दाढी )
शाहू महाराज खैरे -नगरसेवक ( काळी दाढी )
अश्विनी तसरे - प्रेक्षक महिला
धनंजय पवार- प्रसिद्ध आर्किटेक्चर..

Conclusion:
Last Updated : Dec 29, 2019, 5:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.