नाशिक : नाशिकच्या म्हसरूळ परिसरात चालवल्या जाणाऱ्या अनधिकृत ज्ञानदीप आश्रमात ( Gyandeep Ashram Rape Case) सहा अल्पवयीन मुलींवर संशयित संचालक हर्षल मोरे यांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार (director More raped minor girl ) आठवड्यापूर्वी उघडकीस आला होता. आता मोरे यांच्या विरोधात आश्रमातील आणखी एक अल्पवयीन मुलीने मोरेविरुद्ध जबाब नोंदविला आहे. त्यानुसार आरोपीने पीडितेच्या आई-वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी देत (threatening to kill her parents in Nashik) पीडितेला अश्लील व्हिडिओ दाखवून सलग तीन वेळा बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. संशयित मोरे सध्या पोलीस कस्टडीत आहे. latest news from Nashik, Nashik crime
हात पाय दाबून देण्याच्या बहाण्याने अश्लील व्हिडिओ दाखविला : नाशिक शहरात काही खाजगी बेकायदेशीर आश्रम वस्तीगृहांमध्ये गैरप्रकार वारंवार समोर येत आहे. असाच एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या म्हसरूळ शिवारातील द किंग फाउंडेशन नावाच्या संस्थेकडून चालवले जाणारे ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमात एका अल्पवयीन मुलीवर महिनाभरापूर्वी आश्रमातील संचालक संशयित हर्षल मोरे याने पीडित अल्पवयीन मुलीला बळजबरीने इमारतीच्या पार्किंग मधील पत्र्याच्या खोलीत बोलून हात पाय दाबून देण्याच्या बहाण्याने तिला अश्लील व्हिडिओ दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. याची माहिती पोलिसांना मिळाल्या नंतर या मुलींना विश्वासात घेत संशयित मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल त्याला अटक करण्यात आली यानंतर या आश्रमातील आणखी 6 मुलींवर अशाच प्रकारे मोरे याने अत्याचार केल्याच समोर आले आहे. आता त्याच्यात विरोधात महरुळ पोलीस ठाण्यात सात बलात्काचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ब्लॅकमेल करत अत्याचार : नाशिकच्या म्हसरूळ भागातील एका रो हाऊस मध्ये भाडेतत्त्वावर चालवल्या जाणाऱ्या ज्ञानदीप आश्रमातील 13 अल्पवयीन मुली अंघोळ करत असताना त्यांचे मोबाईलद्वारे व्हिडिओ शूटिंग करून संचालक संशयित हर्षल बाळकृष्ण मोरे यांने ब्लॅकमेलिंग करून पीडित मुलींवर अत्याचार केल्याचं पिढीत मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे,आतापर्यंत सात अल्पवयीन मुलीवर या नराधामाने अत्याचार केल्याचं समोर आलंय..
सासू आणि शालकाची नुसती चौकशी : ज्ञानदीप आश्रमाचा संचालक हर्षल मोरे यांच्यावर बलात्कार,पोस्को,ॲट्रॉसिटीचे सात गुन्हे दाखल झाल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे,मोरेची सासू ज्योती शिंदे व मेहुणा असे तिघे मिळून आश्रम चालवत होते, रो -हाऊस मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भाडेतत्त्वावर वर सुरू असलेल्या प्रकाराबाबत मोरे याची सासू व मेहुणा यांना काही माहिती नसल्याचे पोलिस अधिकारी सांगतात, पोलीस हर्षल मोरेच्या सासू व मेहुण्यावर मेहरबान असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे..
तपासात फॉरेन्सिकची मदत: आधार आश्रमातील संचालक संशयित आरोपी हर्षल मोरे यांनी तब्बल सात मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी फॉरेन्सिकच्या मदतीने मोरे राहत असलेल्या माने नगर येथील रो -हाऊस वरून, नगर येथील कागदी द्रोण बनवण्याचा कारखाना तसेच सटाणा येथील मूळगावी जाऊन त्या ठिकाणाहून गादी,सादर,बेडशीट,उशी याशिवाय मोरे वापरत असलेले दोन मोबाईल फोन यासह काही महत्त्वाचे आक्षेपार्ह नमुने संकलित करण्यात आले आहे,संशयित मोरे च्या बंगल्यात आश्रमातील अल्पवयीन मुलींवर अत्याचार करायचा त्या ठिकाणी पोलीस व फॉरेनसिक पथकाला आढळून आलेल्या संशयीताच्या आक्षेपार्ह वस्तूचे नमुने तपासणी केल्यानंतर मोरे यांनी केलेल्या कृत्याचा उलगडा होईल.
मोबाईल डाटा तपासणार : हर्षल मोरे यांने काही मुलींचे अंघोळ करतानाचे फोटो तसेच व्हिडिओ शूट केलेले होते,अशी माहिती पीडित मुलीने केल्याने मोरे वापरत असलेले दोन मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केलेत, त्या मोबाईल मध्ये जुना डाटा तसेच त्याचे नेहमी कोणाशी बोलले होत होते याची माहिती फॉरेन्सिकच्या मदतीने लवकरच समोर येणार असल्याचं पोलिसांनी सांगितले .
सत्संगच्या नावाखाली कुकृत्य : आधार आश्रमातील पीडित अल्पवयीन मुलींना संशयित हर्षल सत्संगाच्या नावाखाली सटाणा वीरगावात वारंवार घेऊन जात होता,तेथे मुलींचे अंघोळ करताना फोटो ,व्हिडिओ मोबाईल मध्ये शूट करून त्यावरून तो पीडित मुलींना धमकावत असल्याचे मुलींनी दिलेल्या जबाबाबत समोर आलं आहे.
देणगीसाठी असा फंडा : आधार आश्रम चालवण्यासाठी संशयित हर्षल याने विविध दानशूर लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी इंस्टाग्राम, फेसबुक तसेच सोशल मीडियाचा वापर केला,समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, लोकप्रतिनिधीना संस्थेत बोलून आश्रमात विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेत,आणि त्यांचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर तो टाकत होता।.
देणगीदारांची चौकशी : ज्ञानदीप आधार आश्रमात निवासी असलेल्या सात अल्पवयीन मुलींनी दिलेल्या जबाबातून त्यांच्यावर संशयित मोरे यांने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे,आश्रम ज्या रो हाऊस मध्ये चालत होता,त्याचे दरमहा आठ हजार रुपये भाडे संशयित मोरे यास एका दानशूर व्यक्ती कडून दिले जात होते, यामुळे पोलिसांनी त्यास पोलीस ठाण्यात बोलून कसून चौकशी केली, शहरातील विविध राजकीय,सामाजिक, व्यवसायिक व्यक्तींना भेटून मोरे हा आश्रमातील आदिवासी मुला -मुलींच्या संगोपणाच्या नावाखाली त्यांच्याकडून देणग्या वसूल करत होता, तसेच विविध देणगीदारांचे वाढदिवस देखील आश्रम साजरे करत होता..
महिला व बालविकास विभागामार्फत चौकशीचे आदेश : नाशिकच्या अनाथ आश्रमातील संचालकाने आश्रमातील सहा अल्पवयीन मुलींचा लैगिंक छळ केल्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्वरित एक समिती स्थापन करून विभागाला सात दिवसात अहवाल सादर करावा,असे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले आहेत.दिनांक 27 नोव्हेंबर रोजी एका वृत्तपत्रात, नाशिकच्या अनाथ आश्रमातील संचालकाने सहा अल्पवयीन मुलींचा लैगिंक छळ केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून याबाबतीत महिला व बालविकास विभागामार्फत सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
बेकायदा आधार आश्रमावर गुन्हे दाखल होणार : नाशिक शहरात अनेक संस्था विना परवानगी आश्रम चालवत असल्याची माहिती पुढे आली आहे, त्यामुळे तहसीलदार स्तरावर समिती गठित करून आपआपल्या कार्यक्षेत्रातील संस्थांची पुढील पंधरा दिवसात तपासणी करावी व त्याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करावा तसेच परवानगी नसताना सुरू असलेल्या आधारतीर्थ व आश्रम सारख्या संस्थांवर गुन्हे दाखल करावे अशा सूचना पोलिसांसह महिला व बाल विकास विभागाला करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी गंगाधरण डी यांनी दिली आहे.