नाशिक - तीन पक्षांचे सरकार आहे, नवा नवा संसार आहे, त्यामुळे सुरुवातीला भांड्याला भांडे लागेल आवाज होईल, अशी मिश्किल प्रतिक्रिया पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली असून, शांततेत सरकार चालले पाहिजे अशी अपेक्षा पाटील यांनी नाशिक येथे बोलताना व्यक्त केली आहे.
हेही वाचा - नाशिक विभागाची आज आढावा बैठक; मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची उपस्थिती
जितेंद्र आव्हाड यांनी काल (बुधवारी) बीड येथील सभेत बोलता म्हटले होते की, आज जे देशात होत आहे, एकेकाळी देशात इंदिरा गांधींनीही असाच लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार केला होता.' यावर पाटील यांनी महाविकास आघाडींच्या नेत्यांमध्ये मत मतांतरे असतील तर त्यावर बंद दाराआड चर्चा केली पाहिजे. तसेच ते म्हणाले, काही दिवसात सर्व शांततेत सुरळीत होईल. नाशिक येथे विभागीय बैठकीसाठी आलेल्या पाटील यांनी महाआघाडीच्या नेत्यांनी शांततेत सरकार चालवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
आव्हाड यांनी इंदिरा गांधींबद्दल केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या असामान्य कर्तृत्वाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. मात्र, बीडमध्ये केलेल्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असे स्पष्टीकरण गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. तसेच इंदिरा गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत कधीच तुलना होऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
हेही वाचा - धक्कादायक! बीड जिल्हा रुग्णालयात सलाईनमध्ये आढळले 'शेवाळ'