रायगड - चैत्र मासारंभ अर्थात मराठी नववर्षाचा प्रथम दिवस नववर्षाचे स्वागत मांगल्याचे प्रतीक गुढी उभारून सर्वत्र गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. येवला तालुक्यातील अंगणगाव शिक्षक कॉलनीतील शिक्षक ज्ञानेश्वर पायमोडे यांनी नववर्षाचे स्वागत सामाजिक संदेश देणाऱ्या पाट्या लावून केला.
नेहमीच गुढीकलश, नववस्त्र, हार, कडूलिंबाची डहाळी व हारडे यांचा वापर करून उभारली जात असते, त्यात भर देत या शिक्षकांनी या गुढीवर अनेक सामाजिक संदेश पाट्या लावल्या. मुलगा मुलगी भेद नको मुलगी झाली खेद नको, मुलगी शिकली प्रगती झाली, लेक वाचवा लेक शिकवा, बचत पाण्याची गरज काळाची, वृद्ध असो किंवा जवान सर्वजण करा मतदान, झाडे लावा झाडे जगवा, मुलगा मुलगी एक समान दोघांनाही शिकवा छान, असे अनेक संदेश गुढीला लावून जागृती करण्यात आली. अशा संदेश गुढी उभारून घरोघरी गुढीपाडवा साजरा करण्यात आला. घरातील गृहिणी संदेश गुढीचे पूजन करून गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.