ETV Bharat / state

रेमडेसिवीरचा वापर आवश्यक असेल तरच करा - छगन भुजबळ

कोरोनाचा रुग्ण बरा होण्यासाठी आवश्यक ती औषधे डॉक्टरांनी द्यावी परंतु रेमडेसिवीरचा वापर आवश्यक असेल तरच करावा शक्यतो त्याचा वापर टाळण्यात यावा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

छगन भुजबळ
छगन भुजबळ
author img

By

Published : May 4, 2021, 8:22 PM IST

नाशिक - नामको चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अवघ्या दहा दिवसांत नामको हॉस्पिटलमध्ये कोविड केअर सेंटरची सरुवात करण्यात आली, हे अतिशय कौतुकास्पद काम आहे. कोरोनाचा रुग्ण बरा होण्यासाठी आवश्यक ती औषधे डॉक्टरांनी द्यावी परंतु रेमडेसिवीरचा वापर आवश्यक असेल तरच करावा शक्यतो त्याचा वापर टाळण्यात यावा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

नामको हॉस्पिटल संचालित आर.एम.डी. कोविड केअर सेंटरचे उदघाटन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने रुग्णसंख्या वाढली असल्याने औषधे व ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र तरी देखील आवश्यक त्या सोयी सुविधा शासन, प्रशासन व सेवाभावी संस्था यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यात बेडची संख्या कमी असतांना आपण ती मोठ्या प्रमाणात वाढविली आहेत. वैद्यकीय क्षेत्रात ज्याला आवश्यक आहे त्याला प्राधान्याने मदत करून देण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. पुढील लाट येण्याच्या अगोदर आपल्याला तयारी ठेवावी लागेल. कायमस्वरूपी व्यवस्था झाल्याने याचा भविष्यात देखील उपयोगी ठरणार आहे, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -कोरोना काळात ८५ टक्के फी वसूली करण्यास खासगी शाळांना सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.