नाशिक - ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. तसेच राज्यात कोरोनाचा धोका कायम असल्याने मराठा समाजाने आंदोलन करू नये, असे आवाहनदेखील त्यांनी केले.
कोरोनाचा धोका पाहता मराठा समाजाने आंदोलन करु नये -
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्याने 6 जूनपर्यंत केंद्र आणि राज्य शासनाने मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी किल्ले रायगडावरून आंदोलनाची दिशा ठरवू, असा सूचनावजा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधताना दिला होता. याविषयी बोलताना राज्यातील परिस्थिती सध्या बिकट असून कोरोनाचा धोका लक्षात घेता मराठा समाजाने आंदोलन करू नये, असे आवाहन भुजबळ यांनी मराठा समाजाला केले आहे.
हेही वाचा - 'ख्वाब-ए-गफलतीतून बाहेर येऊन देशातील गरिबांची दशा पाहावी'; ओवैसींची मोदींवर टीका