ETV Bharat / state

Girish Mahajan on Maratha Reservation : मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी काय दिवे लावले? मराठा आरक्षणावरुन गिरीश महाजनांची टीका - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Girish Mahajan on Maratha Reservation : सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतोय. यावरुन राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. मराठा आरक्षणावर बोलण्यापूर्वी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी काय दिवे लावले हे बघावे, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केलीय. तसंच मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातूनच मार्ग निघेल. यावर कायमस्वरुपी उपाय काढण्यासाठी जरांगे पाटीलांनी शासनाला वेळ द्यावा असंही मंत्री गिरीश महाजनांनी म्हटलंय.

मराठा आरक्षणावरुन गिरीश महाजनांची टीका
Girish Mahajan on Maratha Reservation
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 11, 2023, 9:07 PM IST

गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री

नाशिक Girish Mahajan on Maratha Reservation : मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय बैठकीत तोडगा निघावा असा आमचा प्रयत्न असून जरांगे पाटीलांनी उपोषण सोडावे अशी माझी त्यांना विनंती आहे. दिवसेंदिवस त्यांची तब्येत खराब होत आहे. मराठा आरक्षणावर तात्काळ जीआर काढला तर टिकणार नाही, असं मत मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलंय.

आरक्षणाला कायद्याचा आधार असवा : मंत्री गिरीश महाजन म्हणाले, सुरुवातीला जरांगे पाटीलांची मागणी वेगळी होती. मराठवाड्यातील मराठा समाज वेगळा असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. कुणबी समाज वेगवेगळ्या भागात असून मराठवाड्यातील निजाम काळातून वेगळे झाल्यानंतर समाज कुणबी मराठा झाला. संपूर्ण राज्यातील मराठा समाजाला कुणबी म्हणून दाखवण्याची ते मागणी करताय. हे कायद्याच्या चौकटीत बसणार नाही. कोर्टातूनच आरक्षण घ्यावे लागेल. सरसकट कुणबी म्हणून आरक्षण दिलं तर ते कोर्टात टिकणार नाही. पहिल्याच दिवशी ते फेटाळलं जाईल. त्यासाठी वेळ दिला पाहिजे असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय. पुढे ते म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांचं म्हणणं बरोबर आहे. सगळेच लोक मागणी करू लागतील. पश्चिम महाराष्ट्रातील लोकही बोलतील, आरक्षण सर्वांनाच पाहिजे. कुणाला नको आहे? कॅबिनेटमध्ये निर्णय करून हा प्रश्न सुटणार नाही. त्याला कायद्याचा आधार असला पाहिजे. आजच्या बैठकीत सगळे छोटे मोठे विरोधी पक्ष नेत्याच्या लोकांना बोलावलंय. उदयनराजे, संभाजीराजे यांनादेखील बोलावलंय. सगळा समाज रस्त्यावर उतरला तर राज्याच्या हिताचे होणार नाही असंही मंत्री गिरीश महाजनंनी म्हटलंय.

मुख्यमंत्री असतांना काय दिवे लावले : उद्धव ठाकरे यांच्यावर सगळे लोक हसायला लागले. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल ते खालच्या भाषेत बोलायला लागले. देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलताना उद्धव ठाकरेंची मला कीव येत होती. त्यांच्या मागे कोणी राहिलं नसल्यानं ते अस्वस्थ आहेत. आम्हाला त्यांच शारीरिक व्यंग काढायचं नाही. मुख्यमंत्री असताना तुम्ही काय दिवे लावले, असा टोलाही महाजनांनी उद्धव ठाकरेंना लगावलायं. उद्धव ठाकरे त्यांच्या मनात काही काळबेरं तर नाही ना? त्यांना तर दंगली करायचं नाही ना, अशी शंका यायला लागली. संजय राऊत हे लोकांना उकसवायला लागले. त्यांची चौकशी झाली पाहिजे पोलिसांनी यांनाच ताब्यात घ्यायला हवं असही गिरीश महाजनांनी म्हटलंय. (Girish Mahajan on Uddhav Thackeray)

हेही वाचा :

  1. Legal expert opinion On Maratha Reservation: मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबीचे दाखले मिळू शकतात का? जाणून घ्या कायदेतज्ज्ञांच मत
  2. Maratha Reservation : जरांगे पाटलांनी आंदोलन मागं घ्यावं, सरकारची शिष्टमंडळाकडं विनंती
  3. Maratha Reservation : मराठवाड्यात कुणबी नोंदणीची तपासणी युद्धपातळीवर; ४० हजार कुणबी नोंदी सापडल्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.