नाशिक - गेल्या चार दिवसांपासून त्र्यंबकेश्वरसह धरण परिसरात पाऊस बरसत आहे. या पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रविवारी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार गंगापूर धरण 77 टक्के भरले असून गोदावरी नदीला पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे प्रशासनातर्फे गोदावरी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील शुक्रवारी जोरदार पाऊस झाला होता. यानंतर सलग चौथ्या दिवशीही इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाची रिपरिप सुरु आहे. त्यामुळे येथील धरणे देखील चांगल्या प्रमाणात भरली असून पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. धरणांची पाण्याची पातळी झपाट्याने वाढत झाल्याने नाशिककरांना सध्या पाणी कपातीपासून दिलासा मिळाला आहे
नाशिक जिल्ह्यातील धरण पाणीसाठा खालीलप्रमाणे -
गंगापूर धरण 77 टक्के, दारणा धरण 87 टक्के, भावली धरण 100 टक्के, नादुरमध्येश्वर 96 टक्के, कश्यपी 48 टक्के, गौतमी 58 टक्के आळंदी 66 टक्के, मुकणे 48 टक्के, वालदेवी 82 टक्के तर कडवा 89 टक्के, पालखेड 53 टक्के, ओझरखेड 04 टक्के, वाघाड 32 टक्के, हरणबारि 13 टक्के, गिरणा 08 टक्के, पुनद 25 टक्के, माणिकपुज 0 टक्के, भोजापुर 12 टक्के, तिसगाव 0 टक्के, पुणेगांव 0 टक्के, करजवण 16 टक्के तर, नागासाक्या धरणात 0 टक्के जलसाठा आहे. यात नाशिक जिल्ह्यात आत्तापर्यंत सर्वाधिक 2101 मिमी पाऊस इगतपुरी तालुक्यात झाला आहे.
गेल्या 24 तासात प्रत्येक तालुक्यात पडलेल्या पावसाची तसेच जुन, जुलै मध्ये पडलेल्या पाऊसाची आकडेवारी
1) नाशिक. 18.0 / 541.3 मिमी 2) इगतपुरी 126.0 / 2101.0 मिमी 3) त्र्यंबक 172.0 / 1436.0 मिमी 4) डिंडोरी. 13.0 / 404.0 मिमी 5) पेठ 78.0 / 1282.9 मिमी 6) निफाड. 1.7 / 247.7 मिमी 7) सिन्नर 6.0 / 298.0 मिमी 8) चांदवड 3.0 / 183.0 मिमी 9) देवळा. 4.2 / 156.9 मिमी 10) येवला. 5.0 / 330.2 मिमी 11) नांदगाव 6.0 / 117.0 मिमी 12) मालेगाव 7.0 / 254.0 मिमी 13) बागलाण. 10.0 / 264.0 मिमी 14) कळवण. 11.0 / 134.0 मिमी 15) सुरगाना. 99.3 / 941.4 मिमी