ETV Bharat / state

Ganesh Festival 2023 : ढोल-ताशा महोत्सवाचा जल्लोष; जाणून घ्या, 'नाशिक ढोल'चा इतिहास

Ganesh Festival 2023 :आगामी गणेशोत्सव आणि सणांच्या निमित्तानं नाशिकमध्ये ढोल ताशा महोत्सवाचं शनिवारी आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवाला आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर, श्रेयस तळपदे, सुशांत शेलार यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती.

Ganesh Festival 2023
ढोल ताशा महोत्सव
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2023, 8:06 AM IST

Updated : Sep 10, 2023, 9:27 AM IST

नाशिक Ganesh Festival 2023 : आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ढोल-ताशा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. ऊर्जा युवा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित या महोत्सवात 20 हून अधिक ढोल ताशा पथक सहभागी झाले होते. या महोत्सवाला मराठी सिने अभिनेते श्रेयस तळपदे, सुशांत शेलार तसेच अभिनेत्री सई ताम्हणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यामुळे या अभिनेत्री सई ताम्हणकर, श्रेयस तळपदे यांनी ढोल ( Dhol Tasha ) पथकाच्या वादकांचा उत्साह वाढवला. गणेश विसर्जन मिरवणुकीत नाशिकच्या ढोल ताशा पथकाला देशभरातून मागणी असते.

ढोल-ताशा महोत्सवाचा जल्लोष

शिवसेनेच्या वतीनं ढोल ताशा महोत्सवाचं आयोजन : नाशिक शहराला मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. या शहरात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्या ऊर्जा युवा प्रतिष्ठानच्या वतीनं ठक्कर डोम इथं ढोल-ताशा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवात नाशिक जिल्ह्यातील 20 पेक्षा अधिक ढोल - ताशा पथकांनी सहभाग नोंदवत आपल्या कलेचं सादरीकरण केलं. या महोत्सवात तालबद्ध विशेष सादरीकरण करणाऱ्या ढोल पथकांना मराठी सिने अभिनेते श्रेयस तळपदे, सुशांत शेलार तसेच अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या हस्ते 1 लाख अकरा हजार रुपये, 51 हजार व 31 हजार रुपये रोख बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं. तसेच या ढोल ताशा महोत्सवात लहान मुलांनी मर्दानी खेळ सादर करत उपस्थितांची दाद मिळवली.

काय आहे नाशिक 'ढोल'चा इतिहास : मंदिरांचं शहर ते पर्यटन, गड किल्ल्यांपासून आयटी हबपर्यंत, द्राक्ष नागरी ते वाइन कॅपिटलपर्यंत नाशिक आज जगभरात नावलौकिक मिळवत आहे. यात नाशिकचं आणखी एक महत्त्वाचं बलस्थान म्हणजे नाशिक ढोल. नाशिक ढोलची वेगळी ओळख आहे. पुरातन काळाशी नातं सांगणाऱ्या ढोल-ताशा, शंख-झांजा आणि ध्वजाशी घट्ट नाळ असणाऱ्या ढोल-ताशा पथकांनी आपल्या वादनातून एका अर्थानं सांस्कृतिक ओळख निर्माण केली आहे. अशा पथकांचं श्रीगणेश विसर्जन मिरवणूक आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला लयबद्ध-तालबद्ध वादन ऐकणं ही एक पर्वणीच असते. नाशिक जिल्ह्यात आजमितीला 100 हुन अधिक ढोल पथकं असून काही पथकांमध्ये 3 वर्षाच्या ढोल वादकांपासून ते साठ वर्षाच्या व्यक्तीपर्यंत वादक आहेत. सण उत्सवाच्या काळात नाशिकच्या ढोल पथकांना देशभरातून मागणी असते.

हेही वाचा :

Video पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी बडवला ढोल.. अन् झालं असं काही.. पहा व्हिडीओ

VIDEO पंतप्रधान मोदींनी ढोल वाजवण्याचा घेतला आनंद, पहा व्हिडिओ

Last Updated : Sep 10, 2023, 9:27 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.