ETV Bharat / state

नाशकात कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसायात कोट्यवधींची फसवणूक... - poultry farming

कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसायात होत असलेल्या फसवणुकीचे लोन आता नाशिकमध्ये देखील पसरल्याचे दिसत आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुण्यानंतर नाशिकमध्ये महा रयत अॅग्रो इंडिया या कंपनीच्या ४ संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसायात कोट्यवधींची फसवणूक
author img

By

Published : Sep 10, 2019, 10:19 PM IST

नाशिक - कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसायात होत असलेल्या फसवणुकीचे लोन आता नाशिकमध्ये देखील पसरल्याचे दिसत आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुण्यानंतर नाशिकमध्ये महारयत अॅग्रो इंडिया या कंपनीच्या ४ संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी सरकारने हस्तक्षेप करून न्याय मिळून द्यावा अन्यथा आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही अशा उद्विग्न प्रतिक्रिया दिल्या आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत ८ हजाराहून अधिक लोकांची फसवणूक झाली. तर, राज्यात जवळपास ५०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याची माहिती आहे.

कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसायात कोट्यवधींची फसवणूक

गेल्या काही दिवसांपासून कडकनाथ कुक्कुटपालन हा व्यवसाय फसवणुकीच्या गर्तेत अडकल्याने चर्चेचा विषय ठरत आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुण्यात यापूर्वीच सांगली जिल्ह्यातील महारयत अॅग्रो इंडिया प्रा. लिमिटेड इस्लामपूर या कंपनीच्या संचालकांवर गुन्हे दाखल आहेत. तर, नाशिकमध्ये देखील अशाच प्रकारे अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याने नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांत तक्रारी येऊ लागल्या आहेत.

हेही वाचा - कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणी फसवेबाज कंपनीच्या 'त्या' संस्थापकाला अटक

सदर माहितीप्रमाणे या कंपनीने नाशिकच्या कॅनडा कॉर्नर याठिकाणी कार्यालय सुरू केले होते. प्रदर्शन भरवून अनेकांना माहितीही दिली जात होती. यात नाशिकच्या सय्यद पिंपरी या गावातील शिवदास साळुंके (६३) यांनी हा व्यवसाय सुरू केला होता. यामध्ये २ ते ३ दिवसांच्या कोंबडीच्या पिल्ल्यांचा ३ महिने सांभाळ करून दिल्यावर दुप्पट ते तिप्पट रक्कम मिळणार होती. मात्र ती सांभाळ प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कंपनीचे लोक १५ दिवसांनंतर पैसे देतो अस सांगून कोंबड्या घेऊन गेले. त्यानंतर पैसे मिळत नसल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे साळुंकेच्या लक्षात आल्याने त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपासासाठी एक पथक ही रवाना करण्यात आले आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत ८ हजाराहून अधिक लोकांची फसवणूक झाली असल्याचा अंदाज पोलिसांकडून लावला जात आहे. तर, ५०० कोटीहुन जास्तचा गैरव्यवहार झाल्याचे सांगितले जात आहे. कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसायाच्या बहाण्याने महारयत ऍग्रो इंडिया कंपनीने अनेकांना गंडा घातला असून हळूहळू यातील रकमेचा आणि तक्रारदारांचा आकडा वाढणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा - ''कडकनाथ' प्रकरणी सदाभाऊ खोतांचा राजीनामा घ्यावा'

Intro:कडकनाथ कुकूटपालन यामध्ये होत असलेल्या फसवणुकीच लोन आता नाशिकमध्ये देखील पसरलंय. सांगाली, सातारा, कोल्हापूर आणि पुण्यानंतर नाशिकमध्ये महा रयत ऍग्रो इंडिया या कंपनीच्या चार संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. फसवणूक झालेल्यां व्यक्ती बरोबरच रकमेचा आकडा वाढत आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी सरकारनं हस्तक्षेप करून आम्हाला न्याय द्यावा अन्यथा आत्महत्या केल्या शिवाय पर्याय नाही अशा उद्विग्न प्रतिक्रिया समोर येताय.Body:गेल्या काही दिवसांमध्ये कडकनाथ कुक्कुटपालन हा व्यवसाय चांगलाच चर्चेचा विषय ठरत होता. मात्र अलीकडे तो फसवणुकीच्या गर्तेत अडकला असून चांगलाच चर्चेत आलाय. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुण्यात यापूर्वीच सांगली जिल्ह्यातील महारयत ऍग्रो इंडिया प्रा लिमिटेड इस्लामपूर या कंपनीच्या संचालकांवर गुन्हे दाखल आहेत. नाशिकमध्ये देखील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याने नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांत तक्रारी येऊ लागल्या आहेत. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर याठिकाणी यांनी कार्यालय सुरू केलं होतं. प्रदर्शन भरवत अनेकांना माहितीही दिली जात होती. यातच नाशिकच्या सय्यद पिंपरी या गावातील ६३ वर्षीय शिवदास साळुंके यांनी हा व्यवसाय सुरू केला. मात्र धक्कादायक म्हणजे आपली फसवणूक झाल्याचं नंतर समोर आले. १३ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक झालीय. २ ते ३ दिवसांचे कोंबडीचे पिल्लू घेऊन तीन महिने सांभाळ करून दिल्यावर दुप्पट ते तिप्पट रक्कम मिळणार होती. मात्र कोंबडीची सांभाळ प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कंपनीच्या लोकांनी कोंबड्याही घेऊन गेले. १५ दिवसांनंतर पैसे देतो असं सांगितले मात्र पैसे मिळत नसल्यानं त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं.
Conclusion:सोनं नानं गहान ठेऊन, शेती तारण ठेऊन, नातेवाईकांकडून अनेकांनी पैसे घेऊन हा कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसाय उभा केला होता. त्यात आगाऊ रक्कम ही भरली होती मात्र पैसेही गेले आणि कोंबड्यांना खाद्य औषध नसल्यानं कोंबड्याही मारू लागल्याय. त्यांना जीवदान कसं द्यायचं असा यक्ष प्रश्न उपस्थित होऊ लागलाय.

BYTE 1 - राजेंद्र अहिरे - तक्रारदार
BYTE 2 माधवराव कातकडे - तक्रारदार
BYTE :- विवेक बैरागी - पोलीस उपनिरीक्षक, सरकारवाडा पोलीस ठाणे.....

पोलिसांनी ही घटनेचे गंभीरपणे दखल घेत तातडीनं गुन्हा दाखल केलाय. तपासासाठी एक पथक ही रवाना करण्यात आले असून आत्तापर्यंत राज्यात ५०० हुन अधिक कोटींची फसवणूक झाली असून ८ हजाराहून अधिक लोकांची फसवणूक झाली असावी असा अंदाज पोलिसांकडून लावला जातोय.

BYTE 3..विवेक बैरागी - पोलीस उपनिरीक्षक, सरकारवाडा पोलीस ठाणे

कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसाय हा चांगला असल्याचं सांगत अनेकांना महा रयत ऍग्रो इंडिया कंपनीन गळ घालत अनेकांना गंडा घातलंय. हळूहळू यातील रकमेचा आणि तक्रारदारांचा आकडा वाढणार हे निश्चित आहे. आरोपीही फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहे. त्यामुळे पोलिसांनी वेळीच छडा लावणं गरजेचं असलं तरी सरकारनं याबाबत हस्तक्षेप करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी करताय. मात्र प्रकरण पाहून पोलिसही चक्रावून गेल्यानं आता सरकारने याबाबत योग्य ती पावलं उचलण्याची गरज आहे.

टिप:-तीन बाईट एकत्र पाढवले आहेत..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.