नाशिक - मुबंई आग्रा महामार्गावर धावणाऱ्या मालवाहू ट्रकच्या चालकांना बंदुकीचा धाक दाखवून लुटत जबर मारहाण करणारी गुन्हेगारांची टोळी जेरबंद करण्यात ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय.
एका गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सापळा रचून या चौघांना बेड्या ठोकल्या. पंधरा दिवसांपूर्वी मुबंई आग्रा महामार्गावरून धुळ्याकडे पिकअप जात असताना पहाटेच्या वेळी मालेगाव तालुक्यातील टेहरे गावाच्या शिवारात चौघा लुटारूंच्या टोळीने बंदुकीचा धाक दाखवून वाहन आणि मुद्देमाल लुटला होता. या घटनेनंतर सापळा रचून पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून छऱ्याची बंदूक, पिकअप जीप व रोकड पोलिसांनी हस्तगत केलीये.