ETV Bharat / state

Nashik Factory Fire नाशिक जिंदाल कंपनी आग प्रकरण, आणखी एका कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला - नागरिकांना मास्कसक्ती

इगतपुरी येथील जिंदाल कंपनीला ( Jindal Company Fire Incident In Nashik )लागलेल्या भीषण आगीमुळे प्रचंड धुराचे लोट पसरले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले असले, तरी संसर्गाचा धोका कायम आहे. त्यामुळे परिसरातील 25 गावातील नागरिकांनी मास्क वापरण्याची सक्ती ( Mandatory Mask To People At Nashik Village ) प्रशासनाकडून करण्यात आली आहे. दरम्यान घटनास्थळावर शोध घेणे सुरूच असून आज या ठीकाणी आणखी एका कर्मचाऱ्याचा मृतदेह ( Found One More Dead Body In Jindal Company Fire ) आढळून आला आहे. सुधीर मिश्रा असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

Nashik Factory Fire
जिंदाल कंपनीत लागलेल्या आगीतील धुराचे लोट
author img

By

Published : Jan 4, 2023, 3:37 PM IST

नाशिक - इगतपुरी येथील जिंदाल कंपनीत लागलेल्या आगीत ( Jindal Company Fire Incident ) तब्बल तीन दिवसानंतर एका कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आला आहे. सुधीर मिश्रा असे मृतदेह ( Found One More Dead Body In Jindal Company Fire ) आढळून आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. अजूनही काही मृतदेह आढळून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिंदाल कंपनीत ( Jindal Company Fire Incident At Nashik ) काम करणारे सर्व कामगार परप्रांतीय असल्याने अजूनही काही कामगार बेपत्ता असल्याचा स्थानिक गावकऱ्यांना संशय आहे. आतापर्यंत जिंदाल कंपनीत लागलेल्या आगीत तीन कामगारांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान आग विझली असली तरी धुराचे लोट अजूनही कायम असल्याने प्रशासनाने नागरिकांना मास्कसक्ती ( Mandatory Mask To People At Nashik Village ) केली आहे.

जिंदाल कंपनीतील दुर्घटनेनंतर 25 गावांना मास्क सक्ती नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत झालेल्या अग्निकांडानंतर तिसऱ्या दिवशीही धुराचे लोळ कमी झालेले नाहीत. धूर आणि ऑइलयुक्त केमिकलमुळे हवेत विषारी वायू तयार होण्याची शक्यता आहे. ही शक्यता गृहीत धरून जिंदाल परिसराच्या परिघातील सुमारे वीस किलोमीटर अंतरात येणाऱ्या जवळपास 25 गावांना इगतपुरी प्रशासनाने मास्कसक्तीचे आदेश काढले आहेत.

लाऊड स्पीकर मार्फत सूचना जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत 1 जानेवारी 2022 लागलेल्या आगीनंतर अद्याप धुराचे लोळ कमी झाले नाहीत. त्यामुळे वातावरणात विषारी वायू तयार होण्याची शक्यता असून या परिसरातील नागरिकांनी मास्क वापरावे, अंगभर कपडे घालावे जेणे करून या धुराचा नागरिकांना त्रास होणार नाही, अशा प्रकारच्या सूचना 25 गावांमध्ये दिल्या जात आहेत. यासाठी प्रशासनाच्या वतीने गावागावात रिक्षावर लाऊड स्पीकर लावून सूचना दिल्या जात आहे.

कशी झाली घटना इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीत 1 जानेवारीला सकाळी 11.20 वाजता बॉयलरचा स्फोट झाला. यावेळी लागलेल्या आगीत 2 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 19 जण जखमी झाले होते. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रूग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. तसेच जखमींवर उपचाराचा खर्च शासन करणार करेल आणि मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत दिली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देखील त्यांनी दिले आहेत.

बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या माहितीसाठी संपर्क क्रमांक दुर्घटनेदरम्यान कंपनीत उपस्थित मात्र अद्यापही संपर्क न झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी संबंधित बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या तपशीलासह इगतपुरी तहसील कार्यालयाच्या 02553-2440009 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.