ETV Bharat / state

नाशिक : एकाच रात्री दिंडोरी तालुक्यातील पाच गाईचा मृत्यू - nashik district news

दिंडोरी तालुक्यात एकच रात्री माळेदुमाला येथे पाच गाईचा मृत्यू झाला असून त्यांचा शवविच्छेदनासाठी अहवाल पाठविण्यात आल्याचे डॉ. पी. एस. खंडेराव व डॉ. कौठळे यांनी सांगीतले.

मृत गाई
मृत गाई
author img

By

Published : Apr 6, 2021, 5:09 PM IST

दिंडोरी (नाशिक) - तालुक्यात एकच रात्री माळेदुमाला येथे पाच गाईचा मृत्यू झाला असून त्यांचा शवविच्छेदनासाठी अहवाल पाठविण्यात आल्याचे डॉ. पी. एस. खंडेराव व डॉ. कौठळे यांनी सांगीतले. दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला येथे सोमवारी (दि. 5 एप्रिल) रात्री अचानक पाच गाईचा मृत्यू झाला. पशूधन पाळणारे शेतकरी धास्तावले असून पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गुरांना लसीकरण करावे, अशी मागणी होत आहे.

एकाच रात्री दिंडोरी तालुक्यातील पाच गाईचा मृत्यू

रात्री पाच एप्रिलला धोंडीराम संपत गायकवाड, मंगेश नामदेव गायकवाड, लहाणू संपत गायकवाड, बाळू भास्कर डगळे या शेतमजुरांच्या गाई अचानक रात्री मेल्या त्या गाईच्या तोंडातून फेस व नंतर जमीनीवर चक्कर येवून पडून त्यांचा मृत्य झाला, असे ग्रामस्थांनी सांगीतले. या गाईचा मृत्यू कशामुळे झाला यासंदर्भात पशुधन अधिकारी यांना विचारले असता गाईना विषबाधा झाली असावी, असा प्राथमिक अंदाज डॉ. साबळे यांनी सांगीतले तसेच आता गाईचे शवविच्छेदनचा अहवाल आल्यानंतर गाईच्यामृत्यूचे कारण आपणास समजेल, असेही डॉ. कैलास साबळे यांनी सांगीतले. तसेच दोन दिवसांपूर्वी 10 शेळ्याचाही मृत्यू झाला होता, असे जर्नादन घुगे यांनी सांगीतले. तसेच शासनाने गाईच्या बदल्यात गाय द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा - आरोग्यमंत्र्यांची अचानक मालेगावला भेट; सामान्य रुग्णालयासह महापालिकेच्या रुग्णालयांची केली पाहणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.