नाशिक Apoorva Hiray FIR : आर्थिक गंडा घातल्याप्रकरणी माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांच्यासह इतर तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. उत्तम काळू चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीत जानेवारी 2017 मध्ये कल्पेश बोरसे याच्याशी ओळख झाली होती. त्यानं पंचवटीतील हिरे महाविद्यालयात आपली ओळख असून, त्यांच्या मुलास नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवली. चौधरी यांनी प्रतिसाद न दिल्याने संशयित बोरसे याने पुन्हा त्यांची भेट घेत नोकरीची आमिष दाखवलं. त्यासाठी त्यानं चौधरी यांना महात्मानगर येथील अपूर्व हिरे यांच्या कार्यालयात नेलं. त्याठिकाणी संशयित दीपक चव्हाण आणि डॉ. अपूर्व हिरे यांची ओळख करून दिली.
अशी झाली आर्थिक फसवणूक : संशयित चव्हाण याने दहा लाख रुपयांची मागणी केली. सुरूवातीला पाच लाख आणि काम झाल्यानंतर उर्वरित पाच लाख रुपये देण्याचे ठरलं. चौधरी यांनी मार्च 2017 ला एक लाख 80 हजार आणि एक लाख 85 हजार रुपयांचे दोन धनादेश दिले तर 35 हजार रोख दिले, त्यानंतर चौधरी यांनी सतत संशयितांकडे नोकरीसंदर्भात विचारणा केली असता, नोकरी हमखास लागेल, असं सांगितलं. नोव्हेंबर 2019 मध्ये संशयित बोरसे याने तुमच्या मुलाचे काम झाल्याचं सांगत दोन दिवसांत उर्वरित पाच लाखांची मागणी केली. त्यानुसार 11 नोव्हेंबर 2019 ला चौधरी यांनी रोख पाच लाख रुपये संशयित बोरसे यास दिले.
उडवाउडवीची उत्तरे दिली : त्यानंतरही त्यांनी विचारणा केली असता, संशयित उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. संशयितांनी दोन वेळा पाच लाखांचे धनादेश दिलं. परंतु ते बँकेत वटलेच नाही. त्याचा जाब विचारला असता, संशयितांनी चौधरी यांना शिवीगाळ करत दम दिला. त्यामुळं फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चौधरी यांनी उपनगर पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी डॉ. अपूर्व हिरे यांच्यासह कल्पेश बोरसे, अमर रामराजे, दीपक चव्हाण, अमर रामराजे यांच्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या आधी देखील हिरे कुटूंबावर गुन्हा दाखल : नाशिक जिल्हा परिषदेकडे नियमबाह्य पद्धतीने प्रस्ताव पाठवून शहरातील आदिवासी सेवा संस्थेसह महात्मा गांधी विद्यामंदिरात शिक्षक आणि लिपिकांची बोगस भरती केल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात संस्थेच्या प्रमुख आ्णि माजी मंत्री पुष्पा हिरे आणि माजी मंत्री आणि संस्थेचे सेक्रेटरी प्रशांत हिरे, जॉइंट सेक्रेटरी डॉ. अपूर्व हिरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांच्यासह 66 जणांविरोधात फसवणुकीचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक डॉ. किरण कुवर यांच्या तक्रारीवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शासनाचे लाखो रुपयांचे वेतन लाटले : आदिवासी सेवा संस्था आणि महात्मा गांधी विद्या मंदिरात (Mahatma Gandhi Vidya Mandir) या दोन्ही संस्था मोठ्या आहेत. जिल्हाभरात त्यांचे जाळे आहे. या संस्थांमध्ये शासनाची कोणतीही परवानगी नसताना शिक्षक भरती करण्यात आली. तसा प्रस्ताव शिक्षण अधिकाऱ्यांना हाताशी धरून मंजूर करण्यात आला, आदिवासी सेवा संस्थेत सात शिक्षक आणि एक लिपिकाची भरती करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून या संदर्भात बोगस पद्धतीने भरलेल्या शिक्षकांचे लाखो रुपयांचे वेतन देखील काढण्यात आले. वेतनापोटी मंजूर झालेला शासकीय निधीचा अपव्य केला. भरती करताना सर्व शासकीय नियम पायदळी तुडवले म्हणून कलम 420, 406, 476, 471,34 अन्वये भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा -
- Case against Nandurbar collector : शासनाची तब्बल 10 कोटींची फसवणूक; तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळेंविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
- Pune Crime : सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात खंडणीसह फसवणुकीचा गुन्हा दाखल
- Hasan Mushrif: राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल