ETV Bharat / state

किसान मोर्चा थांबवण्याची गिरीश महाजनांची धडपड अयशस्वी, लाँग मार्च मुंबईकडे - Mumbai

किसान सभेने मागील वर्षी मंत्रालयावर काढलेल्या पायी मोर्चानंतर शासनाने दिलेल्या आश्वासनाची वर्षभरात पूर्तता न झाल्याने किसान सभेने पुन्हा एकदा पायी मोर्चाचे शस्त्र उगारले आहे.

Nashik
author img

By

Published : Feb 21, 2019, 2:03 PM IST

नाशिक - किसान सभेने मागील वर्षी मंत्रालयावर काढलेल्या पायी मोर्चानंतर शासनाने दिलेल्या आश्वासनाची वर्षभरात पूर्तता न झाल्याने किसान सभेने पुन्हा एकदा पायी मोर्चाचे शस्त्र उगारले आहे. हजारो आदिवासी शेतकऱ्याचा लाँग मार्च मुंबईकडे कूच करत आहे.

Nashik
Nashik

बुधवारी किसान सभेच्या प्रमुख नेत्यांची पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सोबत झालेली बैठक अयशस्वी झाल्याने आज मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे. जोपर्यंत सरकार लेखी स्वरूपाचे ठोस आश्वासन देत नाही, तोपर्यंत आंदोलन स्थगिती करणार नाही, असा निर्धार मोर्चेकऱ्यांनी केला आहे. या मोर्चाचे नेतृत्व किसान सभेचे आमदार जे पी गावीत, अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, किसान गुजर आदी करत आहेत.

या आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या-

  • १) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे, यासाठी नारपार, दमणगंगा, वाघ व पिंजाळसह अरबी समुद्राकडे वाहणाऱ्या या नद्यांचे पाणी अडवून ते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना द्या, असे करताना स्थानिक शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, गावे बुडणार नाहीत याची संपूर्ण काळजी घ्या. या योजनेचा येथील स्थानिक शेतकऱ्यांना लाभ व्हावा, यासाठी पाणी राखीव ठेवा. या पाण्यावर महाराष्ट्राचा हक्क असल्याने ते गुजरातला देण्याचे कारस्थान ताबडतोब बंद करा.
  • २) दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना एकरी किमान ४० हजार रुपये पीक नुकसान भरपाई द्या, वीजबिल माफ करा, पिण्याचे पाणी, चारा, अन्न, रोजगार, व आरोग्य सुविधा द्या, मागेल त्याला किमान प्रतिदिन ३००/- रुपये प्रमाणे रोजगार हमीचे काम द्या, दुष्काळ निवारण व निर्मूलनासाठी विविध समित्यांनी सुचविलेल्या शिफारशींची कालबद्ध अंमलबजावणी करा. दुष्काळाबाबतच्या केंद्रीय संहितेतील चुकीचे निकष बदला, पीक विमा योजना शेतकरी हिताची करा, जल वितरण व्यवस्थेचे दुरुस्तीकरण व आधुनिकीकरण करा. विद्यार्थ्यांची सर्व प्रकारची फी माफ करा.
  • ३) वनाधिकार कायदा २००६ च्या तरतुदींचे पुरावे सादर करण्याबाबत चुकीचा अर्थ लावून वनजमीन कसणाऱ्यांना अपात्र ठरवणे थांबवा, कायद्याच्या तरतुदीनुसार कोणतेही २ पुरावे सादर करणाऱ्या दावेदारांचे दावे पात्र करा, कसत असलेली संपूर्ण जमीन कसणाऱ्यांच्या नावाने मुख्य कब्जेदार सदरी लावा. बिगर-आदिवासींसाठी ३ पिढ्या वनात रहिवासी असल्याबाबतच्या पुराव्याचा योग्य अर्थ लावून त्यांच्यावरील अन्याय दूर करा.
  • ४) सर्व कष्टकरी व संकटग्रस्त शेतकऱ्यांना विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती द्या, शेतीमालाला दीडपट भावाची हमी देणारा कायदा करा, स्वामीनाथन आयोगाच्या शेतकरी हिताच्या सर्व शिफारशींची अंमलबजावणी करा.
  • ५) देवस्थान इनाम वर्ग-३, गायरान, बेनामी जमिनी, वरकस, आकारीपड जमिनी कसणाऱ्याच्या नावे करा.
  • ६) निराधार योजनांचा गरजू व्यक्तींना तत्काळ लाभ द्या, मानधनात वाढ करून मानधन किमान ३०००/- रुपये करा.
  • ७) जीर्ण झालेल्या शिधापत्रिका बदलून द्या. संयुक्त शिधापत्रिकांचे विभक्तीकरण करा, सर्व शिधापत्रिका धारकांना अंत्योदय दराने रेशन द्या, हाताचे ठसे उमटत नाहीत, अशा श्रमिकांना रेशन नाकारणे तत्काळ बंद करा.
  • ८) विकास कामांच्या बहाण्याने बुलेट ट्रेन व एक्सप्रेस/ समृद्धी हायवेच्या नावाने शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याकडून काढून घेण्याचे कारस्थान बंद करा.
  • ९) राज्यमार्गाच्या जमिनीचे शेतकऱ्यांकडून रास्त मोबदल्यासह अधिग्रहण न करता जमिनी परस्पर महामार्गासाठी वर्ग करणे थांबवा, शेतकऱ्यांना जमीन अधिग्रहण कायदा २०१३ प्रमाणे चालू बाजारभावाच्या पाचपट मोबदला द्या.
  • १०) सातबारा संगणकीकरण करताना पीक पाहणीच्या नोंदीसह आजवर उताऱ्यांवर असलेल्या सर्व नोंदींची नोंद संगणीकृत उताऱ्यावर येईल याची संपूर्ण दक्षता घ्या.
  • ११) परभणी तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २०१७ची पीक विमा भरपाई दिनांक
  • १० ऑक्टोबर २०१८ रोजीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे गंगाखेड तालुक्यातील निकषाच्या धर्तीवर तत्काळ द्या.
  • १२) शेतकरी आंदोलनात वेळोवेळी झालेल्या पोलीस केसेस त्वरित मागे घ्या.
  • १३) पॉलीहाऊस व शेडनेट धारकांचे संपूर्ण कर्ज रद्द करून या शेतकऱ्यांच्या विमा, बाजारभाव, व्यापार संरक्षण आदी समस्या सोडविण्यासाठी विशेष धोरण घ्या.
  • १४) ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या एफआरपीचे पैसे कायद्याप्रमाणे ऊस तुटून गेल्यावर १४ दिवसांच्या आत मिळतील यासाठी कठोर पावले उचला.
  • १५) नाशिक ते मुंबई लाँग मार्च २०१८च्या वेळी किसान सभेबरोबर झालेल्या चर्चेत मान्य केलेल्या सर्व मागण्यांची तत्काळ अंमलबजावणी करा.
undefined

Intro:शिक्षकांच्या आंदोलनाला तावडे घाबरले, परीक्षेपूर्वी बोलावून दिले कार्यवाही करण्याचे आश्वासनBody:शिक्षकांच्या आंदोलनाला तावडे घाबरले, परीक्षेपूर्वी बोलावून दिले कार्यवाही करण्याचे आश्वासन

मुंबई, ता. 20 :
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकून त्यासाठी राज्यभरात असहकार आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, त्यामुळे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज या शिक्षण संघटनेच्या प्रतिनिधींना बोलावून त्यांचे प्रश्न लवकरच सोडविण्याचे आश्वासन दिले. यामुळे कनिष्ठ महाविद्यालय शिक्षण संघटनेचा बारावीच्या परीक्षेवरील बहिष्कार तुर्तास मागे घेण्यात आल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली.
शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत शिक्षणमंत्र्यांनी बुधवारी (ता. 20) तातडीची बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील 1656 कनिष्ठ महाविद्यालये व 523 तुकड्या अनुदानासाठी पात्र असल्याचे जाहीर करण्यात आले. त्याचप्रमाणे 26 फेब्रुवारी रोजी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत बैठक घेण्याचे आश्‍वासन देण्यात आले. त्यामुळे शिक्षकांनी असहकार आंदोलन मागे घेतले असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, ऐन परीक्षेच्या काळातच परीक्षांवर बहिष्कार आणि असहकार आंदोलन करणाऱ्या शिक्षकांवर सरकारने ठोस कारवाई करावी अशी मागणी आज पालक संघटनेकडून करण्यात आली आहे. जर काही मुठभर लोकांच्या संघटना विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा संघटनांवर सरकारने कायमस्वरूपी वचक निर्माण होईल अशी कारवाई करावी अशीही मागणी केली जात आहे.Conclusion:शिक्षकांच्या आंदोलनाला तावडे घाबरले, परीक्षेपूर्वी बोलावून दिले कार्यवाही करण्याचे आश्वासन

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.