ETV Bharat / state

वटवाघळांचा द्राक्ष पिकावर हल्ला; पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी अशी लढवली शक्कल

दिंडोरी तालुक्यात द्राक्ष पीक तयार झाले असताना त्यावर वटवाघळांचे संकट ओढावले आहे. या वटवाघळांपासून संरक्षणाकरता आता शेतकरी आपल्या शेतातील द्राक्ष बागांवर बडनेट(जाळी) टाकून द्राक्ष वाचविण्याच्या प्रयत्नात आहेत.

author img

By

Published : Dec 27, 2019, 2:39 PM IST

Updated : Dec 27, 2019, 3:26 PM IST

nashik
द्राक्ष बागांच्या संरक्षणार्थ बडनेटचा वापर

नाशिक - दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष पिकांवर आधी अवकाळी पावसाचे संकट आले. यातून वाचलेल्या पिकांना धुके व थंडीपासून वाचवण्याकरिता शेतकऱ्यांना मेहनत करावी लागली. तर, आता द्राक्ष पीक तयार झाले असताना त्यावर वटवाघळांचे संकट ओढावले आहे. या वटवाघळांपासून संरक्षणाकरिता आता शेतकरी आपल्या शेतातील द्राक्ष बागांवर बडनेट(जाळी) टाकून द्राक्ष वाचविण्याच्या प्रयत्नात आहेत.

nashik
द्राक्षांची पाहणी करताना शेतकरी

दिंडोरी तालुक्याला द्राक्ष पंढरी म्हणून संबोधले जाते. मात्र, यावर्षी आगस्ट व सप्टेंबर महिण्यात जोरदार पाऊस असल्यामुळे द्राक्ष पिकांना वाचवताना शेतकऱ्यांना अतोनात मेहनत करावी लागली. धुके व थंडीमुळे द्राक्षे फुटणार नाहीत यासाठी रात्री शेकोटी करून द्राक्ष पीक वाचवली. परंतू, आता १२० दिवासांचे काळी सोनाका पीक विक्रीसाठी तयार झाले असतांना त्या पिकावर वटवाघळांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे द्राक्ष वाचविण्यासाठी शेतकरी बडनेट (जाळी) संपूर्ण बागावर टाकून आपली द्राक्ष वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, ही जाळी रात्री चमकत असल्यामुळे कुठलेही पक्षी रात्री द्राक्षाचे नुकसान करत नसल्याचे द्राक्ष उत्पादक वसंत काळोगे यांनी सांगितले. या द्राक्ष पिकांची ३ सप्टेंबर रोजी गोळाबार छाटणी करण्यात आली. तर, पाऊस असल्यामुळे याला एकरी ३ लाखांपर्यंतचा खर्च आल्याचे काळोगे म्हणाले.

हेही वाचा - वेबसीरिजमुळे मुलांमध्ये विकृती वाढत आहे - वर्षा उसगावकर

काळी सोनाका पीक वाचविण्यासाठी निवृत्ती मधुकर काळोगे, वसंत मधूकर काळोगे हे रात्रीचे दिवस करताहेत. तयार झालेल्या द्राक्षाला रात्री वटवाघूळ व दिवसा कावळे, सांळूखी या पक्षांपासून वाचवण्याकरता त्यांना खडा पहारा द्यावा लागत असल्याचे निवृत्ती काळोगे यांनी सांगितले. १ एकरात शेणखत ३५ हजार, गोळाबार छाटणी, मजूरी ४५ हजार, खत-औषध १ लाख ७५ हजार, शेडनेट १० हजार, निसाई २० हजार, असा एकूण ३ लाखांपर्यंतचा खर्च झाल्याचे काळोगे यांनी सांगितले.

हेही वाचा - तुम्ही विश्वास नांगरे-पाटलांचा "बाला"डान्स पाहिलात का..?

Intro:नाशिक - दिंडोरी तालुक्यात द्राक्ष पंढरी म्हणून संबोधला जात असतांना या वर्षी आगस्ट व सप्टेंबर महिण्यात जोरदार पाऊस असल्यामुळे या वर्षी द्राक्ष पिका वाचवतांना शेतकऱ्यांना अतोनात मेहनत करावी लागत असतांना मध्ये धुके व थंडीमुळे द्राक्ष ला तडपडणार नाही या साठी रात्री शेकोटी करून आपले द्राक्ष पिक वाचविले परंतू आता १२०दिवासाचे काळी सोनाका पिक विक्रीसाठी तयार झाले असतांना त्यापिकावर वटवाघुळ पक्षाचा उपद्रव वाढल्याने त्या पक्षा पासून द्राक्ष वाचविण्यासाठी शेतकरी बडनेट ( जाळी ) संपूर्ण बागावर टाकून आपली द्राक्ष वाचवित आहेत त्या जाळी टाकल्यामुळे रात्री ती जाळी चमकत असल्यामुळे कुठलेही रात्री पक्षी द्राक्षचे नुकसान करत नसल्याचे द्राक्ष उत्पादक वसंत काळोगे यांनी सांगीतलेBody:द्राक्ष पिकाची तिन सप्टेबर रोजी गोळाबार छाटणी केल्यामुळे व पाऊस असल्यामुळे एकरी तिन लाखापर्यत खर्च झाला Conclusion:काळी सोनाका पिक वाचविण्यासाठी निवृत्ती मधुकर काळोगे , वसंत मधूकर काळोगे हे रात्रीचे दिवस करत असून तयार झालेल्या द्राक्षाला रात्री वटवाघूळ , व दिवसा कावळे व सांळूखी पक्षासाठी खडा पहारा दयावा लागत असल्याचे निवृत्ती काळोगे यांनी सांगीतले . . एक एकरात तिन लाख खर्च शेणखत ३ ५ हजार गोळाबार छाटणी, मजूरी४५ ,खत औषध १लाख७५ हजार, शेटनेट १० हजार ,निसाई २०हजार, असा एकून खर्च आजपर्यत झाल्याचे काळोगे यांनी सांगीतले
Last Updated : Dec 27, 2019, 3:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.