नाशिक - जिल्ह्यात रोहिणी व मृग नक्षत्रात पावसाने थोडीफार हजेरी लावली. त्यामुळे थोडासा दिला मिळाला असला तरी शेतकरी आता खरिपाची पेरणी करण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा करत आहे.
नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, देवळा, मालेगाव, नादगांव या तालुक्यात मागील ३ वर्षांपासून शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले. त्यामुळे यावर्षी तरी चांगला पाऊस पडेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
शेतकऱ्याची शेतीची नांगरणी, वखरणी, मशागत अशी पावसाळ्याआधीची कामे पूर्ण झाली आहेत. शेतकरी आता फक्त प्रतीक्षा करत आहे ती पावसाची. शेतकऱ्यांसोबत प्रशासनही येणार्या पावसाळी हंगामासाठी तयार झाला आहे. जिल्ह्याला आवश्यक असलेले खते व बियाणे संपूर्ण साठा उपलब्ध करण्यात आलेला आहे.
जिल्ह्यात रोहिणी व मृग नक्षत्रात पावसाने थोडीफार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यामुळे यंदा पाऊस वेळेवर व चांगला होईल, अशी आशा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आहे.