येवला (नाशिक) - येवला बस स्थानक आवारामध्ये नायलॉन मांज्यात एक घुबड अडकल्याचे तेथून चाललेल्या एका शेतकऱ्याला दिसले. या शेतकऱ्याने घुबडाची मांज्यातून सुटका ( Farmer saved owl trapped in nylon thread ) करून त्याला जीवदान दिले आहे. नवनाथ गायकवाड असे शेतकऱ्याचे नाव आहे.
हेही वाचा - Theft of LED Yeola : फर्निचर दुकानातून एलईडीची चोरी, घटना CCTV मध्ये कैद
शेतकरी नवनाथ गायकवाड आपल्या कामानिमित्ताने येवला बस स्थानक परिसरातून चालले होते. त्याचवेळी त्यांना नायलॉन मांज्यात घुबड अडकल्याचे दिसले. ते आपल्या जिवाची परवा न करता त्या टेम्पोवर चढले व टेम्पोद्वारे फरसाणच्या दुकानाच्या छतावर जाऊन मांजात अडकलेल्या घुबडाला त्यांनी खाली उतरवले व त्याच्या गळ्या भोवती व पंखा भोवती अडकलेला मांजा स्थानिक नागरिकांच्या मदतीने काढून त्यास जीवदान दिले. त्यानंतर या घुबडाला त्याच्या अधिवासामध्ये सोडून देताच घुबडाने गगनभरारी घेतली. घुबडाला जीवदान दिल्यामुळे जमलेल्या नागरिकांनी गायकवाड यांचे कौतुक केले.
हेही वाचा - Yeola Godawn Seal : 33 लाख रुपये थकबाकी भरली नाही; नगरपालिकेकडून मक्याचे गोडाऊन सील