नाशिक - बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक शेतकरी जखमी झाला. आवडू सोमा आवाली असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास इगतपुरी तालुक्यातील खेड भैरव परिसरात घडली.
हेही वाचा - संतापजनक! घटस्फोटासाठी पत्नीचे सार्वजनिक ठिकाणी पोस्टर लावून बदनामी, विकृत पतीविरोधात गुन्हा दाखल
शेतकरी जिल्हा रुग्णालयात दाखल -
काही दिवसांपूर्वी याच गावात एका लहान मुलीवर बिबट्याने केला होता हल्ला. यानंतर पुन्हा शनिवारी रात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. या शेतकऱ्याला अधिक उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आवारी हे शेतातून घरी येत असताना रस्त्यात शनिवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान बिबट्याने हल्ला केला. यात त्यांच्या कानाला, मानेला गंभीर दुखापत झाली. यावेळी शेतकरी आवाली यांच्या आवाजाने परिसरातील नागरिक धावू आले. यानंतर बिबट्याने पळ काढला. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, दुसऱ्यांदा बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडल्यामुळे बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली. या प्रकाराने नागरिक भयभीत झाले आहेत.
हेही वाचा - नागपुरात संचारबंदीपूर्वी 2252 कोरोनाग्रस्तांची भर, आजपासून संचारबंदीला सुरूवात