नाशिक - शासनाने परवानगी देऊन देखील पिककर्ज मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले असून पीक कर्जासाठी शेतकऱ्यांनी बँक ऑफ महाराष्ट्राच्या वेहेळगाव शाखे समोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन नवीन पीककर्ज देण्याच्या सूचना देऊनही ऑगस्ट महिना उजाडला असला तरी बँका पीक कर्जासाठी टाळाटाळ करत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. नांदगांव तालुक्यातही अशीच परिस्थिती होती. मात्र, मंगळवारी (दि. 4 ऑगस्ट) शेतकऱ्यांचा बांध सुटला आणि त्यांनी तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या वेहेळगाव शाखेसमोर उपोषण सुरू केले.