येवला ( नाशिक) - ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर कर्जबाजारीपणाला कंटाळून येवला तालुक्यातील रेंडाळे गावातील शेतकरी अशोक लांडे यांनी आत्महत्या केली आहे. अशोक लांडे यांच्यावर बँकेचे तीन ते चार लाखाचे कर्ज होते.
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे पुरेसे असे उत्पन्न या पिकातून मिळाले नसल्याने व कर्जबाजारीपणाला कंटाळून अशोक लांडे या शेतकऱ्याने आपल्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कर्जाबाबत बँकेकडून तगादा सुरू होता. त्यामुळेच लांडे यांनी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
हेही वाचा - परभणीत अतिवृष्टीमुळे होत्याच नव्हतं, तरुण शेतकऱ्याने घेतली फाशी