ETV Bharat / state

नाशिकमध्ये बोलक्या अक्षरांचे प्रदर्शन, शब्द रचनाकार सुनील धोपावकर यांची अक्षरे चर्चेचा विषय - प्रदर्शनात दीडशे नवीन फॉन्ट

प्रत्येक अक्षराला त्यांच्या अर्थानुसार आकार तो त्याच्या दृश्य चित्रातून व्यक्त करण्याची अनोखी कला शब्द रचनाकार सुनील धोपावकर यांच्या टायपोग्राफित आहे. त्यांची बोलकी अक्षरे सध्या नाशिकमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

शब्द रचनाकार सुनील धोपावकर यांची अक्षरे चर्चेचा विषय

author img

By

Published : Jan 29, 2021, 12:45 PM IST

नाशिक - प्रत्येक व्यक्तीला एखादा छंद असतो. आपल्या समाधानासाठी तो छंद जोपासण्याचे काम ती व्यक्ती करत असते. असाच एक छंद नाशिकचे सुप्रसिद्ध अक्षर रचनाकार सुनील धोपावकर यांना जडला आहे. अक्षर बघता क्षणी त्यातून प्रत्येकाला त्याचा अर्थ समजेल असे सुंदर अक्षरांचे अनोखे प्रदर्शन नाशिकमधील औरंगाबादकर सभागृहात भरवण्यात आले आहे.

नाशिकमध्ये बोलक्या अक्षरांचे प्रदर्शन

अक्षरांमध्ये आंतरिक सेन्स अभिव्यक्त करण्याची जादू
प्रत्येक अक्षराला त्यांच्या अर्थनुसार शरीरसौष्ठव देत दोन अक्षरातील डोळ्यांना सुखावणारा तसेच शब्दात न सांगता येणारी आंतरिक सेन्स अभिव्यक्त करण्याची शब्दरेषाकार सुनील धोपावकर यांच्या टायपोग्राफित आहे. त्यांची बोलकी अक्षरे सध्या नाशिकमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक महाविद्यालयातील विद्यार्थिनी आणि नागरिक या प्रदर्शनाला भेट देत अक्षर जाणून घेतली आहेत जवळपास एक हजारहून अधिक अनोखी अक्षरे या प्रदर्शनात आहे.

प्रदर्शनात दीडशे नवीन फॉन्ट
या अक्षर प्रदर्शनात दीडशे नवीन फॉन्ट वापरून ही अक्षरे तयार केली गेली आहेत. या प्रदर्शनात विद्यार्थी आल्यानंतर त्यांना हि अक्षर बघून आश्चर्य वाटत आहे. विशेष म्हणजे सुनील धोपावकर यांचीही तीन वर्षांची अपार मेहनत आहे ताज्या घडामोडींवर ते लक्ष ठेवून लगेच आपल्या अक्षरात उतरवतात आनंद वनातील घटना, सुशांत सिंग आत्महत्या प्रकरण ही त्यांनी एका अक्षरात मांडलेआहे. त्यामुळे त्यांचे हे प्रदूषण वैशिष्ट्यपूर्ण वाटत आहे.

मराठी माणसाला असावी म्हणून अक्षर प्रदर्शन
1978 सालापासून टेलिव्हिजन तसेच मराठीमध्ये प्रकाशक क्षेत्र अशा विविध ठिकाणी जाहिरातीत लागणारे सुंदर अक्षर बनवण्याचे काम हे धोपावकर यांनी केले आहे. हे काम करताना 40 वर्षात त्यांना असे लक्षात आले की मराठी अक्षर सौंदर्याची जाण मराठी माणसाला झालेली नाही ती कशी करून देता येईल यासाठी हे नाविन्यपूर्ण असते. अक्षरे तयार करून अक्षर प्रदर्शन भरवण्यात आले असल्याचे सुधीर धोपावकर यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - 'लाल किल्ल्यातील घटनेआडून सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या नाकारू शकत नाही'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.