ETV Bharat / state

अत्यावश्यक सेवा वगळता येवल्याच्या बाजारपेठेत शुकशुकाट - nashik corona news

आज रविवारीदेखील बंदची कडक अंमलबजावणी करण्यात आल्याचे चित्र येवला शहरासह ग्रामीण भागात दिसून आले.

yeola essential services
yeola essential services
author img

By

Published : Mar 14, 2021, 2:18 PM IST

येवला (नाशिक) - येवल्यात आठवड्यातील प्रत्येक शनिवार व रविवार तसेच आठवडे बाजार बंदचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला असून आज रविवारीदेखील बंदची कडक अंमलबजावणी करण्यात आल्याचे चित्र येवला शहरासह ग्रामीण भागात दिसून आले.

मुश्रीफ शहा

कडकडीत बंद

येवला शहर तसेच तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यावसायिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला साथ देत कडकडीत बंद पाळला. मात्र या बंदला दुकानदारांचा विरोध आहे.

बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

शनिवार व रविवार तसेच आठवडे बाजार अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने व व्यावासायिक आस्थापना पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाच्या आदेशाला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून व्यावसायिकांनी त्यास चांगला प्रतिसाद दिला.

बंदला व्यापारी संघटनेचा विरोध

शनिवार व रविवार तसेच आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याने या निर्णयाला व्यापारी संघटनेकडून विरोध केला असून शनिवार-रविवारी बंदमध्ये शिथिलता द्यावी, अशी मागणी व्यापारी संघटनेकडून होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.